शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाच्याचं जावळ काढून येताना मामाच्या दुचाकीला अपघात, दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 19:19 IST

घटनास्थळावरून मिळालेल्या महितीनुसार, ओकोली येथील युवक युवराज कुंभार याची सख्खी बहिण बोरपाडळे गावात दिली आहे

सांगली/मलकापूर : भाच्याचे जावळ काढून शाहूवाडीकडे जात असताना कोल्हापूर - रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गीवरील जुळेवाडी (ता. शाहूवाडी ) खिंडीच्या घाटात मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात दोघे युवक ठार झाले. सीपी आर पोलिस चौकीत याची नोंद झाली आहे. अपघातात ठार झालेल्या युवकांची नांवे ऋतूराज सुनील कुंभार वय २७ (रा. बोरपाडळे ता. पन्हाळा) युवराज पांडुरंग कुंभार वय ३२ (रा. ओकोली ता. शाहूवाडी) अशी आहेत. ही घटना दुपारी ३ वाजता घडली. 

घटनास्थळावरून मिळालेल्या महितीनुसार, ओकोली येथील युवक युवराज कुंभार याची सख्खी बहिण बोरपाडळे गावात दिली आहे. तिच्या मुलाचे आज मुंज काढण्याचा कार्यक्रम होता. बहिणीने भावाला भाच्याची मुंज काढण्यासाठी निरोप दिला होता. युवराज कुंभार सकाळी आपला मित्र ऋतुराज कुंभारला सोबत घेऊन दोघेही मोटारसायकलवरुन बोरपाडळे येथे गेले होते. मुंज काढण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर जेवण करुन शाहूवाडीकडे जात असताना कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर जुळेवाडी खिंडीच्या घाटात रस्त्यात पडलेल्या नारळाच्या पिशवी वरुन मोटार सायकल् घसरून ऋतुराज कुंभार व युवराज कुंभार रस्त्यावर पडल्याने जागीच ठार झाले. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. 'दोघांना १०८ ॲम्ब्यूलन्स मधून सी.पी.आर रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. 

सी.पी.आर रुग्णालयात दोघांच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती. ऋतुराज कुंभार मलकापूर येथे कंत्राटी लाईनमन म्हणून महावितरण कंपनीकडे कामाला होता. मनमिळावू स्वभावाचा असल्याने त्याचा मित्र परिवार मोठा होता. कर्त्यव्यदक्ष लाईनमन म्हणून त्याला ओळखले जात होते. या दुर्घटनेमुळे बोरपाडळे व ओकोली गावावर शोककळा पसरली आहे. 

टॅग्स :AccidentअपघातSangliसांगलीkolhapurकोल्हापूर