गुड्डापूरच्या दान्नमादेवी देवस्थानमध्ये गैरव्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:28 IST2021-02-16T04:28:12+5:302021-02-16T04:28:12+5:30

बसवंताप्पा पुजारी यांनी यासंदर्भात जत न्यायालयात जनहितार्थ याचिका दाखल केली होती. न्यायालयाने या १२ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून ...

Malpractice in Dannamadevi Devasthan of Guddapur | गुड्डापूरच्या दान्नमादेवी देवस्थानमध्ये गैरव्यवहार

गुड्डापूरच्या दान्नमादेवी देवस्थानमध्ये गैरव्यवहार

बसवंताप्पा पुजारी यांनी यासंदर्भात जत न्यायालयात जनहितार्थ याचिका दाखल केली होती. न्यायालयाने या १२ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून चौकशी करावी व पुढील कायदेशीर कारवाई करावी, असा आदेश दिला आहे. त्यानुसार जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्री धान्नमादेवी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष प्रकाश शिवाप्पा गणी (वय ७६, रा. तिकोटा, जि. विजापूर), चंद्रशेखर रेवाप्पा गोब्बी (वय ६४, रा. जत), बाळासाहेब गाडवे (वय ६३, रा. मिरज), विश्वनाथ शिवाप्पा गणी (वय ७७, रा. विजापूर), सदाशिव सम्नुखाप्पा गुड्डोडगी (वय ६३, रा. अथणी, जि. बेळगाव), सिद्धय्या हिरेमठ (रा. सोलापूर), भिमाण्णा पुजारी व संतोष पुजारी (दोघे रा. गुड्डापूर), सचिव विठ्ठल पुजारी (रा. गुड्डापूर), माजी विश्वस्त विश्वनाथ गणी (रा. विजापूर), शंभुलिंग म्हमदापूर (रा. आथणी), चंद्रशेखर पुजारी, गुरुपाद पुजारी (दोघे रा. गुड्डापूर) या बारा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

गुड्डापूर येथे कर्नाटक व महाराष्ट्र शासनाने तीर्थक्षेत्र विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. याशिवाय भाविक श्रद्धेपोटी देवीला सोने, चांदी व रोख रक्कम दान करतात. देवस्थानचे विश्वस्त कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील आहेत.

देवस्थानचे अध्यक्ष व आजी- माजी विश्वस्थ आणि सचिव यांनी देवस्थान समितीच्या विविध विकास कामांत बेकायदेशीर तरतुदी करून मोठ्या प्रमाणात स्वतःसाठी फायदा करून घेतला आहे. देवस्थानचा कारभार धर्मादाय आयुक्तांनी घालून दिलेल्या नियमावलीनुसार न होता मनमानीपणे सुरू आहे, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक उत्तम जाधव या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Web Title: Malpractice in Dannamadevi Devasthan of Guddapur