शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

सांगली रस्त्यावर रेल्वे उभारणार मॉल, रेल्वे व्यवस्थापकांकडून मिरजेत जागेची पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 15:52 IST

मिरज-सांगली रस्त्यावरील जुन्या पुलाची पाहणी

मिरज : मिरजेतसांगली रस्त्यावर रेल्वे हद्दीत रेल्वेचा बहुपयोगी मॉल उभारण्यात येणार असून, यासाठी निविदा काढण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेचे पुणे विभागीय नूतन व्यवस्थापक राजेशकुमार वर्मा यांनी मिरजेत जागेची पाहणी केली. त्यांनी पुणे ते कोल्हापूर रेल्वे मार्गावर सुरू असलेल्या विविध कामांचीही पाहणी केली.मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापकपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर राजेशकुमार वर्मा यांनी सातारा, मिरज व कोल्हापूर पाहणी दौरा केला. मिरज-सांगली रस्त्यावर कृपामयीसमोर असणाऱ्या रेल्वेच्या जागेत रेल्वेतर्फे बहुपयोगी मॉल उभारण्यात येणार आहे. या परिसरातील अतिक्रमणे व झोपडपट्टी हटविण्यात आली आहेत. रेल्वेच्या या बहुपयोगी मॉलमध्ये दुकाने, हॉटेल, लॉज, सिनेमागृह असणार आहे. या कामासाठी निविदा काढण्यात येणार आहे.यासाठी मिरजेतील जागेची रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक व अधिकाऱ्यांनी पाहणी केली. या कामाची निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुणे ते कोल्हापूर रेल्वे मार्गावर अमृत भारत योजनेंतर्गत मिरज रेल्वेस्थानकाचा विकास करण्यात येणार आहे.मिरज-सांगली रस्त्यावरील जुन्या पुलाची पाहणीविभागीय व्यवस्थापकांनी कोल्हापूर, हातकणंगले, मिरज, सांगली, कराड, सातारा या स्थानकांची पाहणी केली. मिरज रेल्वेस्थानकासह अपघात मदत व्हॅन, मालधक्का, गुड्स यार्ड, आरआरआय, लॉबी या विभागांची पाहणी केली. काही विभागात त्रुटी आढळल्याने त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना खडसावले. पुणे ते मिरज या २८० किमी दुहेरीकरण व विद्युतीकरण पूर्ण होत आले आहे. या कामासह मिरज-सांगली रस्त्यावरील जुन्या पुलाची पाहणी व्यवस्थापक राजेशकुमार वर्मा यांनी केली.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजrailwayरेल्वे