शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही; मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
2
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
3
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
4
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
5
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
6
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
7
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
8
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
9
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
10
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
11
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
12
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
13
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
14
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
15
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
16
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
17
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
18
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
19
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
20
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 

मालगाव पाणी योजना आर्थिक संकटात-पाणीपट्टीची थकबाकी ८४ लाखांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 23:49 IST

मालगाव (ता. मिरज) ग्रामपंचायतीने ११ कोटी ६८ लाख रुपये खर्च करून पाणी पुरवठा योजना करूनही, पाणीपट्टीचे थकीत ८४ लाख आणि महावितरणचे वीज बिल ३५ लाख थकीत असल्याने योजनाच आर्थिक संकटात सापडली आहे. नागरिकांकडील थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी ग्रामपंचायतीने पाणी पुरवठ्याची कनेक्शन्स बंद करण्याची कारवाई सुरु

ठळक मुद्देग्रामपंचायतीकडून वसुलीसाठी पाणी कनेक्शन केली बंद

अण्णा खोत ।मालगाव : मालगाव (ता. मिरज) ग्रामपंचायतीने ११ कोटी ६८ लाख रुपये खर्च करून पाणी पुरवठा योजना करूनही, पाणीपट्टीचे थकीत ८४ लाख आणि महावितरणचे वीज बिल ३५ लाख थकीत असल्याने योजनाच आर्थिक संकटात सापडली आहे. नागरिकांकडील थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी ग्रामपंचायतीने पाणी पुरवठ्याची कनेक्शन्स बंद करण्याची कारवाई सुरु केली आहे. पण, यासही नागरिकांचा फारसा प्रतिसाद नसल्याचे दिसत आहे.

शासनाच्या राष्ट्रीय पेयजल योजनेतून मालगाव ग्रामपंचायतीने ११ कोटी ६८ लाख रुपये खर्च करुन पाणी पुरवठा योजना राबविली आहे. या योजनेमुळे शुध्द पाणी पुरवठ्याची सोय झाली आहे. महावितरणचा विजेचा दरही जादा असल्यामुळे वसूल होणाऱ्या पाणीपट्टीत योजना चालविणे ग्रामपंचायतीसमोर मोठे आव्हान आहे. याचबरोबर अनेक कुटुंबियांनी पाणी पुरवठ्याचे कनेक्शनच घेतलेले नाही. मालगावची लोकसंख्या ४० हजार असूनही गावांमध्ये केवळ १४७५ जणांनी पाणी कनेक्शन्स घेतली आहेत. यापूर्वीच्या ग्रामविकास अधिकाºयांनी वसुलीकडे दुर्लक्ष केल्याने सध्या चालूसह जुनी पाणीपट्टी ८४ लाखांवर पोहोचली आहे. या योजनेच्या थकीत वीज बिलाचा आकडाही दिवसेंदिवस वाढत असून सध्या ३५ लाखांची थकबाकी झाली आहे. पाणीपट्टीची वसुली नसल्याने पाणी योजनेला ग्रहण लागले आहे.

वीज बिल थकबाकीमुळे महावितरणने वसुलीच्या नोटिसा ग्रामपंचायतीला बजावल्या आहेत. थकीत पाणीपट्टीच्या ८४ लाख रुपये थकबाकीपैकी वसुली मोहिमेत ७० हजार रुपयांची वसुली झाली आहे. या रकमेतून चालूचे वीज बिल भरल्यामुळे वीज परवठा खंडितचा धोका टळला आहे. ग्रामपंचायतीच्या प्रयत्नामुळे योजनेचा वीज पुरवठा खंडित झाला नसल्यामुळे गावाला पाणी पुरवठ्याची टंचाई नाही. असे असले तरी थकीत वीज बिलासाठी महावितरणच्या अधिकाºयांकडून मालगाव पाणी योजनेचा वीज पुरवठा कोणत्याहीक्षणी खंडित होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायतीने कठोर पाऊल उचलत पाणीपट्टीची थकबाकी असलेल्यांची कनेक्शन्स तोडण्याची गरज आहे. थकीत पाणीपट्टी वसुलीच्या मोहिमेत ३० ते ४० पाणी पुरवठ्याची कनेक्शन्स ग्रामपंचायतीने बंद केली आहेत. यापुढेही कारवाईची मोहिम राबविण्यात येणार असल्याचे प्रदीप सावंत यांनी सांगितले.थकबाकीचा बोजा : घरावर चढवण्यात येणारयोजना चालविताना देखभाल, दुरूस्ती व वीज बिलासाठी तरतूद ही पाणीपट्टीच्या वसुलीवर अवलंबून आहे. सद्यस्थितीला वीज बिल सुमारे ३५ लाखथकीत बिलाची वसुली न झाल्यास त्याचा वाईट परिणाम योजनेवर होण्याची शक्यता असल्याने वसुलीसाठी नळ कनेक्शन्स खंडित करण्याची मोहीम सुरु आहे. थकबाकी न भरणाºयांच्या घरावर थकबाकीचा बोजा चढविण्यात येणार आहे. ग्रामस्थांनी याची दखल घेऊन पाणीपट्टी भरण्याचे आवाहन गटनेते प्रदीप सावंत, सरपंच असलम मुजावर व ग्रामविकास अधिकारी डी. आर. शिंदे यांनी केले आहे.सहकार्य करावेवसुलीसाठी ग्रामपंचायतीने नळकनेक्शन खंडीत करण्याची मोहीम राबविली आहे. पाणी योजना टिकविण्यासाठी ग्रामस्थांनी पाणीपट्टी व घरपट्टी भरणे आवश्यक आहे. कर वसुलीसाठी ग्रामविकास अधिकाºयांना अधिकार दिल्याचे सरपंच असलम मुजावर यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीwater shortageपाणीटंचाई