शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: सात लाखांच्या लाचखोरीप्रकरणात शुभम गुप्ता यांना सहआरोपी करा, संघर्ष समितीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 18:15 IST

..अन्यथा उच्च न्यायालयात धाव घेणार

सांगली : महापालिका उपायुक्त वैभव साबळे याला सात लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अटक झाली असली, तरी यामागे खरे ‘आका’ तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता हेच आहेत. त्यांनाही या प्रकरणात सहआरोपी करावे, अशी मागणी जिल्हा संघर्ष समितीने केली. समितीतर्फे तानाजी रुईकर आणि वास्तुविशारद रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार बैठकीत सांगितले की, तशी मागणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आहे. त्यांनी गुप्ता यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला नाही, तर आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत.सांगलीत २४ मजल्यांच्या इमारतीला बांधकाम परवाना देण्यासाठी सात लाखांची लाच मागितल्याप्रकरणी उपायुक्त वैभव साबळे याला सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. आमराई परिसरात सी. के. असोसिएटसतर्फे सांगली शहरातील पहिली २४ मजली इमारत उभारण्यात येत आहे. या कंपनीकडे साबळे यांनी लाच मागितली होती. त्यामुळे कंपनीचे कर्मचारी रुईकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार साबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात आली.मात्र, लाच मागण्यामागे मुख्य सूत्रधार तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता हेच आहेत, असा दावा रुईकर व रवींद्र चव्हाण यांनी केला. त्यांनी सांगितले की, कोणताही बांधकाम परवाना ६० दिवसांपेक्षा जास्त काळ महापालिकेत अडवून ठेवता येत नाही. पण, आमचा परवानगी मागणीचा प्रस्ताव २४० दिवसांहून अधिक काळ प्रलंबित राहिला होता. आयुक्त गुप्ता यांनी फक्त एका सहीसाठी फाइल अडवली होती. ते पैशांची मागणी करत होते.गंभीर तथ्य नसलेल्या त्रुटी काढून फाइल चारवेळा परत पाठवली. इमारतीमधील प्रति सदनिकेसाठी १० हजार रुपये मागितले. त्यांच्या सूचनेवरून साबळे यांनी पैशांची मागणी सुरू केली. गुप्ता यांनी पैशांची थेट मागणी केली नसली, तर सबळ कारण नसताना काम अडवून ठेवणे हादेखील लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हाच होतो. त्यामुळे त्यांनाही सहआरोपी करावी यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत.

महापालिकेचे सव्वादोन कोटी रुपयांचे नुकसान२४ मजली इमारतीच्या बांधकाम परवान्यापोटी महापालिकेला सुमारे सव्वादोन कोटी रुपयांचा महसूल मिळणार होता. मात्र, आयुक्तांनी १० लाखांसाठी हा महसूल अडवून ठेवला. यामध्ये महापालिकेचे मोठे नुकसान झाले. गुप्ता यांच्या बदली काळात त्यांच्या पंटरांनी आयुक्त बंगल्यात बसून त्यांच्या संगणकावरून अनेक कामांना मंजुरी दिली. त्याच्याही चौकशीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत.नगरसेवक म्हणतात, आयुक्तांना प्रमोशनसाठी पैसे हवेतरुईकर व चव्हाण यांनी सांगितले की, काही पक्षांचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी तसेच माजी नगरसेवक हेच अधिकाऱ्यांसाठी एजंट म्हणून काम करत असल्याचे दिसून आले. गुप्ता यांना जिल्हाधिकारीपदी पदोन्नती मिळवायची आहे. त्यासाठी ८ कोटींचा ‘टोल’ भरायचा आहे. त्यासाठीच पैसे द्यायचे आहेत, असे हे एजंट सांगत असायचे.