शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोयनेचे पाणीनियोजन आणीबाणी स्तरावर करा, भारत पाटणकर यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 12:36 IST

फडणवीस यांच्यासोबत बैठकीसाठी प्रयत्न

सांगली : कोयना धरणातील पाण्याच्या ढोबळ आणि अशास्त्रीय नियोजनामुळे सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यांना दुष्काळाचा सामना करावा लागण्याची भीती आहे. शासनाने उपलब्ध पाण्याचे नियोजन आणीबाणी स्तरावर करावे, असे आवाहन पाणी धोरण संघर्ष मंचाचे सहनिमंत्रक भारत पाटणकर यांनी केले आहे. यासंदर्भात चर्चेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठकीची विनंती केली आहे.उपमुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोयना धरणातीलपाणी वापराची तूट १९.७१ टीएमसी आहे. ३५ टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी वापरायचे आहे. त्यापैकी १२ टीएमसी पिण्यासाठी व सिंचनासाठी वापरण्याचा विचार शासन करत आहे. याचा वीजनिर्मितीवर व उपसा सिंचन योजनांवर काय परिणाम होणार याचा विचार आवश्यक आहे. या स्थितीत राज्यासाठी ग्रीडमधून वीज घेण्याचे नियोजन करावे लागेल. त्यामुळे १२ टीएमसी पाणी पिण्यासाठी व सिंचनासाठी वळवता येईल. हा निर्णय आणीबाणीच्या पातळीवर घ्यावा.

पाटणकर यांनी सांगितले की, कोयना धरणात सध्या ८० टीएमसी पाणी वापरासाठी उपलब्ध आहे. त्यापैकी ३५ टीएमसी वीजनिर्मितीसाठी गेल्यास ४५ टीएमसी पिण्यासाठी व सिंचनासाठी राहते. त्यात आणखी १२ टीएमसी वळवले, तर ५७ टीएमसी होते. मात्र याच्या उपलब्धतेसाठी गांभीर्याने विचार करावा लागेल. 

टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ या योजनांतून पाण्याची नासाडी मोठ्या प्रमाणात होते. बेकायदा उपसा होतो. त्याविरोधात कडक धोरण राबवावे. शेवटाकडून सुरुवातीला पाणी वितरणाचे धोरणही काटेकोरपणे राबवावे. प्रसंगी पोलिसांची मदत घ्यावी. यासंदर्भात अधिवेशनापूर्वी व्यापक बैठकीचे नियोजन उपमुख्यमंत्र्यांनी करणे आवश्यक आहे.

टॅग्स :SangliसांगलीKoyana Damकोयना धरणWaterपाणी