कवठेमहांकाळला विद्यापीठाचे उपकेंद्र करा - पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:33 IST2021-07-07T04:33:03+5:302021-07-07T04:33:03+5:30
ते म्हणाले की, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तासगाव तालुक्यातील बस्तवडे येथे शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राची घोषणा केली; ...

कवठेमहांकाळला विद्यापीठाचे उपकेंद्र करा - पाटील
ते म्हणाले की, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तासगाव तालुक्यातील बस्तवडे येथे शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राची घोषणा केली; पण तेथील जागेची पाहणी केली नाही. वास्तविक विद्यापीठाचे उपकेंद्र करायचे असेल तर कवठेमहांकाळ हे मध्यवर्ती ठिकाण होऊ शकते. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या बैठकीत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा समावेश नव्हता. कुठल्याही संस्था प्रतिनिधींचा समावेश नव्हता. त्यासाठी सांगली जिल्ह्यातील घटना समिती गठित केली गेली नाही. तासगावसाठी आमचा विरोध नाही; पण तासगावपेक्षा कवठेमंहाकाळ मध्यवर्ती ठिकाण होऊ शकते. आमची कवठेमहांकाळ तालुक्याची प्रामुख्याने मागणी आहे.
ते म्हणाले की, विद्यापीठाचे कुलगुरू व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सावंत यांना येत्या एक दोन दिवसात निवेदन देणार आहे. सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागातील कवठेमहांकाळ तालुक्यात विद्यापीठाचे उपकेंद्र करावे, अशी मागणी तमन्नगौडा रवी पाटील यांनी केली आहे.
050721\img-20210227-wa0014.jpg
शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र जत किंवा कवठेमहांकाळ येथे करण्यात यावे