शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात अवकाळी पावसाने द्राक्षबागांचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 14:27 IST

GrapeFarmar Sangli- सांगली जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्री झालेल्या पावसाने द्राक्षबागाांचे मोठे नुकसान झाले असून काढणी झाललेल्या ज्वारी, हरभरा या पिकांसह झेंडूचीही हानी झाली आहे. तासगाव तालुक्यात सावळज, डोंगरसोनी येथे वादळी वाऱ्याने चार द्राक्षबागा कोसळून सुमारे ३५ लाखाचे नुकसान झाले.

ठळक मुद्देजिल्ह्यात अवकाळी पावसाने द्राक्षबागांचे मोठे नुकसान, अन्य पिकांनाही फटका सावळज, डोंगरसोनीला द्राक्षबागा कोसळल्याने ३५ लाखाची हानी

सांगली : जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्री झालेल्या पावसाने द्राक्षबागाांचे मोठे नुकसान झाले असून काढणी झाललेल्या ज्वारी, हरभरा या पिकांसह झेंडूचीही हानी झाली आहे. तासगाव तालुक्यात सावळज, डोंगरसोनी येथे वादळी वाऱ्याने चार द्राक्षबागा कोसळून सुमारे ३५ लाखाचे नुकसान झाले.सांगली शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात बुधवारी मध्यरात्री विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. सांगली, मिरजेसह कवठेमहांकाळ, तासगाव, इस्लामपूर येथे मध्यम स्वरुपाचा तर जत, आटपाडी, खानापूर, कडेगाव परिसरात तुरळक सरी कोसळल्या. शिराळ्यात केवळ ढगांची दाटी होती.

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाने पिकांच्या नुकसानीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. यामध्ये द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. काहीठिकाणी मणी फुटून तर काही ठिकाणी बागा कोसळून नुकसान झाले आहे. नुकसानीचा आकडा अद्याप समोर आलेला नाही. येत्या दोन दिवसात नुकसानीचे चित्र स्पष्ट होईल.तासगाव तालुक्यात सावळज येथे नितीन शिवाजी तारळेकर यांची एस.एस. एन जातीची सुमारे पाऊण एकर द्राक्षबाग कोसळून अंदाजे ८ ते ९ लाखाचे, डोंगरसोनी येथील शेतकरी रमेश ज्ञानोबा झांबरे यांची सुपरसोन्नाका जातीची एक एकर द्राक्षबाग कोसळून ८ ते १० लाखाचे, डोंगरसोनीचेच प्रकाश हंबीरराव पवार यांच्या दीड एकर बागेचे कोसळून दहा लाखाचे तर याच गावातील तुळशीराम हंकारे यांची १ एकर बाग कोसळून ७ लाखाचे नुकसान झाले आहे.जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्यापासूनच शेतकऱ्यांनी बागा वाचविण्यासाठी धडपड सुरु केली होती. यात काहींना काहीप्रमाणात यश मिळाले, मात्र काहींना नुकसानीचा सामना करावा लागला. 

टॅग्स :fruitsफळेFarmerशेतकरीRainपाऊसSangliसांगली