शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: आंध्र प्रदेशातील दरोडाप्रकरणी मुख्य संशयिताला अटक; अडीच कोटींचे सोने जप्त

By शरद जाधव | Updated: October 31, 2023 19:16 IST

एलसीबी, आंध्र प्रदेश पोलिसांची संयुक्त कारवाई

सांगली : आंध्रप्रदेशातील गलाई व्यवसायिकाच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकून लुटमार करणाऱ्या मुख्य संशयिताला पोलिसांनी जेरबंद केले.नितीन पांडूरंग जाधव (वय ३५, रा. कार्वे ता. खानापूर) असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून तब्बल दोन कोटी ४० लाख ५० हजार रुपये किंमतीचे चार किलो सोने जप्त करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि आंध्र प्रदेश पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.टनुकू (जि. पश्चिम गोदावरी, आंध्र प्रदेश) येथे नामदेव गुरूनाथ देवकर हे गलाईचा व्यवसाय करतात. याशिवाय सोन तारण व्यवसायही त्यांचा आहे. त्यांच्याकडेच कामगार म्हणून काम करणाऱ्या सुरज कुंभार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी १२ सप्टेंबर रोजी देवकर यांच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकून ऐवज लंपास केला होता. या प्रकरणातील तीन संशयितांना यापूर्वीच अटक करत त्यांच्याकडून एक कोटी ७७ लाख रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.या प्रकरणात संशयित नितीन जाधवचा पोलिसांकडून शोध सुरू होता. रविवारी आंध्र प्रदेश व एलसीबीचे पोलिसांच्या पथकाला माहिती मिळाली की, संशयित जाधव हा विटा-सांगली मार्गावर दुचाकीवरून जात आहे. त्यानुसार पथकाने तिथे जात लिंब गावाजवळ सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याजवळ सोन्याचे दागिने व लगड मिळून आली. केलेल्या चौकशीत त्याने टनुकू येथे साथीदारांसह दरोडा टाकल्याचे सांगितले. यानंतर त्याला अटक करण्यात आली.पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, आंध्रचे पोलिस उपअधीक्षक सी. सरथ राजकुमार, सी. एच. अंननेवेलू, सी.एच. व्यंकटेशराव, डी. आदीनारायण, सहायक निरीक्षक पंकज पवार, सिकंदर वर्धन आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

चार कोटींचे सात किलो सोने हस्तगतयाच पथकाने यापूर्वी तीन आरोपींना अटक तर एक कोटी ७७ लाखांचे सोने हस्तगत केले होते. यानंतर आता जाधव याच्याकडूनही चार किलो सोने हस्तगत केले आहे. या दरोड्यातील चार कोटी १७ लाख ५० हजार रुपयांचे सोने हस्तगत करण्यात आले आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस