वाकुर्डे बुद्रुक येथे मुख्य प्रवेश रस्ते बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:45 IST2021-05-05T04:45:37+5:302021-05-05T04:45:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : तालुक्यात २५ गावांमध्ये ६० नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. वाकुर्डे बुद्रुक येथे सात ...

Main access roads closed at Wakurde Budruk | वाकुर्डे बुद्रुक येथे मुख्य प्रवेश रस्ते बंद

वाकुर्डे बुद्रुक येथे मुख्य प्रवेश रस्ते बंद

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : तालुक्यात २५ गावांमध्ये ६० नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. वाकुर्डे बुद्रुक येथे सात दिवसांत कोरोनामुळे आठ मृत्यू झाले आहेत. सध्या गावामध्ये एकूण २५ पेक्षा जास्त रुग्ण आहेत. यामुळे गावचे प्रवेशाचे रस्ते बंद करून युवक पहारा देत आहेत.

मंगळवारी शेडगेवाडी ६, इंगरुळ, सागाव प्रत्येकी ५, शिराळा, कापरी प्रत्येकी ४, भाटशिरगाव, भटवाडी, मांगले, निगडी, पाडळी, पणुंब्रे तर्फ शिराळा, वाकुर्डे बुद्रुक प्रत्येकी ३, आरळा, मालेवाडी प्रत्येकी २, चरण, चिखलवाडी, फुफिरे, हत्तेगाव, करुंगली, काशीदवाडी, खराळे, खेड, लादेवाडी, नाठवडे, पावलेवाडी प्रत्येकी १ असे रुग्ण आढळून आले आहेत.

सध्या तालुक्यात ६६२ उपचाराखाली रुग्ण असून यामध्ये मिरज कोविड रुग्णालयात १, शिराळा कोविड सेंटर १०, शिराळा कोविड रुग्णालयात ४६, कोकरूड कोविड रुग्णालय २७, स्वस्तिक हॉस्पिटल १४, दालमिया सेंटर १, होम आयसोलेशनमध्ये ५६३ असे रुग्ण उपचार घेत आहेत.

Web Title: Main access roads closed at Wakurde Budruk