शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

म्हैसाळमधील ९ जणांची सामूहिक आत्महत्या नव्हे तर हत्याकांड, तपासात धक्कादायक माहिती आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 20:10 IST

जेवणातून विष घालून वनमोरे कुटुंबियाना मारल्याचे उघड

सांगली : संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या म्हैसाळ (ता. मिरज) येथील एकाच कुटुंबातील नऊजणांच्या सामूहिक आत्महत्या प्रकरणाला आज, सोमवारी कलाटणी मिळाली. वनमोरे कुटुंबीयांनी आत्महत्या केली नसून, त्यांना विषारी द्रव्य देऊन त्यांचा खून करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रकरणी सोलापूरच्या दोघांना अटक करण्यात आली असून, गुप्तधनाच्या प्रकरणातून हे हत्याकांड घडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.आब्बास महंमदअली बागवान (वय ४८, रा. मुस्लीम बाशा पेठ, सरवदेनगर, सोलापूर) व धीरज चंद्रकांत सुरवसे (३०, रा. वसंतविहार ध्यानेश्वरीनगर, जुना पुना नाका, सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

म्हैसाळ येथे सोमवार, दि. २० रोजी विष पिल्याने एकाच कुटुंबातील नऊजणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. सकृतदर्शनी तो सामूहिक आत्महत्येचा प्रकार वाटत होता. संपूर्ण राज्यात या प्रकरणाने खळबळ उडाली होती. मृत्यू झालेल्या वनमोरे कुटुंबातील कोणीही मागे राहिले नसल्याने गूढ वाढले होते.सावकारांच्या त्रासाला कंटाळून हा प्रकार घडल्याचा निष्कर्ष काढत पोलिसांनी परिसरातील २५ जणांवर गुन्हा दाखल करून १९ जणांना अटक केली होती. पोलिसांचा अधिक तपास सुरू होता. आता आणखी दोन संशयितांना अटक करत त्या आत्महत्या नसून सर्वांचे खून करण्यात आल्याचे अधीक्षक गेडाम यांनी सांगितले.

अटकेतील दोघे मांत्रिकच?अटक केलेले दोघेही मांत्रिकच असून त्यांनीच गुप्तधनाचे आमिष दाखवून वनमोरे कुटुंबाकडून वारंवार पैसे घेतले होते. घटनेच्या आदल्या रात्रीही संशयित म्हैसाळ येथे येऊन गेल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र, बागवान व सुरवसे हे दोघे नक्की कोण आणि त्यांनी नऊजणांची हत्या का घडवली याबाबत गेडाम यांनी तपास सुरू असल्याचे सांगत अधिक सांगण्याचे टाळले.

'या' नऊजणांचा खून

डॉ. माणिक यल्लाप्पा वनमोरे, रेखा माणिक वनमोरे, आक्काताई यल्लाप्पा वनमोरे, आदित्य माणिक वनमोरे, प्रतिमा माणिक वनमोरे, शुभम पोपट वनमोरे, पोपट यल्लाप्पा वनमोरे, संगीता पोपट वनमोरे, अर्चना पोपट वनमोरे यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

गुप्तधनाबाबत भेटीमृत डॉ. माणिक वनमोरे व पोपट वनमोरे या भावांच्या अनोळखी व्यक्तींसोबत गुप्तधनाबाबत भेटी होत होत्या. यासाठी वेळोवेळी त्यांनी त्या व्यक्तिंना पैसेही दिले होते. त्या व्यक्ती रात्री वनमोरे यांच्या घरीही येत होत्या, अशी माहिती मिळाली. त्यानुसार तपास करत पोलिसांनी सोलापूर येथील दोघांना अटक केली.

जेवणातून देण्यात आले विषनऊजणांच्या मृत्यूचे कोडे उलगडताना विषारी द्रव्य देऊन त्यांचा दोघांनी खून केल्याचे पोलिसांनी सांगितले. १९ रोजी रात्री वनमोरे कुटुंबाला जेवणातूनच हे विष देण्यात आल्याची शक्यता असून, संशयितांकडून घटनाक्रम जाणून घेतला जात आहे. यानंतर याची माहिती देऊ, असे अधीक्षक गेडाम यांनी सांगितले.अन्य सावकारांचा शोध सुरू

वनमोरे कुटुंबातील नऊजणांच्या मृत्यूनंतर केलेल्या तपासात सावकारांकडूनही त्रास देण्यात येत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील १९ जणांना अटक करण्यात आली आहे, तर उर्वरित सहाजणांचा शोध सुरू असल्याचे अधीक्षकांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीPoliceपोलिस