शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
3
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
4
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
5
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
6
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
7
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
8
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
9
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
10
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
11
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
12
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
13
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
14
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
15
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
16
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
17
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
18
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
19
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
20
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश

म्हैसाळ सामूहिक आत्महत्या प्रकरण: १३ जणांना अटक, २५ खासगी सावकारांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 14:47 IST

अटक केलेल्यात सावकार, डाॅक्टर, शिक्षकाचा समावेश. दरम्यान या घटनेमुळे मिरज तालुका हादरून गेला आहे. म्हैसाळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सांगली : म्हैसाळ येथील डाॅ. माणिक वनमोरे कुटूंबातील नऊ जणांच्या आत्महत्याप्रकरणी २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून १३ जणांना अटक केली आहे. खासगी सावकाराकडून वारंवार होणारा अपमान, व्याजाच्या पैशासाठी तगाद्यामुळे वनमोरे कुटूंबाने टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिस तपासात समोर आल्याचे पोलिस अधिक्षक दीक्षीत गेडाम यांनी पत्रकार बैठकीत दिली.अटक केलेल्यांत नंदकुमार रामचंद्र पवार (वय ५२, नदीवेस), राजेंद्र लक्ष्मण बन्ने (५०), अनिल लक्ष्मण बन्ने (३५, दोघे माळेवाडी, नरवाड), खंडेराव केदारराव शिंदे (३७, रा. मारुती मंदिराजवळ), डाॅ. तात्यासाहेब आप्पान्ना चौगुले, रेखा तात्यासाहेब चौगुले (४५, रा. शिंदे रोड), शैलेश रामचंद्र धुमाळ (५६,), संजय ईराप्पा बागडी (५१), अनिल बाळू बोराडे (४८), शिवाजी लक्ष्मण कोरे (६५), विजय विष्णू सुतार (५५), पाडूंरग श्रीपती घोरपडे (५६, सर्व रा. म्हैसाळ, ता. मिरज), प्रकाश कृष्णा पवार (४५, रा. बेडग) या तेरा जणाचा समावेश आहे.तर आशू शैलेश धुमाळ, अनाजी कोंडीबा खरात, शामगोंडा कमगोंडा पाटील, सतीश सखाराम शिंदे, शिवाजी नामदेव खोत, गणेश ज्ञानू बामणे, शुभदा मनोहर कांबळे, नंदकुमार रामचंद्र धुमाळ, राजेश गणपती होटकर, आण्णासो तातोबा पाटील, नरेंद्र हणमंत शिंदे, अनिल बाबू बारोडे, संजय इराप्पा बागडी (सर्व रा. म्हैसाळ) यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.म्हैसाळ (ता. मिरज) येथे एकाच कुटुंबातील नऊ जणांनी दोन बंगल्यांत विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली होती. जनावरांचे डॉक्टर असलेल्या माणिक यल्लाप्पा वनमोरे यांच्या बंगल्यात डॉ. वनमोरे (४९), पत्नी रेखा (४५), मुलगा आदित्य (१५), मुलगी प्रतिमा (२१), आई आक्काताई (७२), पुतण्या शुभम (२८) यांचा, तर दुसऱ्या बंगल्यात शिक्षक असलेले बंधू पोपट वनमोरे (५२), पत्नी संगीता (४८), मुलगी अर्चना (३०) यांचा मृतदेह आढळून आला होता. एकाच वेळी झालेल्या या सामूहिक आत्महत्येने जिल्हा हादरला आहे.  

दोन चिठ्ठ्या सापडल्याडाॅ. माणिक वनमोरे व त्यांचे बंधू पोपट वनमोरे यांच्या घरात प्रत्येकी एक चिठ्ठी सापडली आहेत. या चिठ्ठीत खासगी लोकांकडून कर्जाने पैसे घेतले आहेत. त्या पैशाची परतफेड करण्यात अडचणी येत आहेत. हे कर्ज व्यापाऱ्यासाठी घेतले होते, असा उल्लेख आहे. पण किती रक्कम घेतली होती, याचा उल्लेख चिठ्ठीत नाही.

शवविच्छेदन अहवाल राखून ठेवलामिरज शासकीय रुग्णालयात नऊ जणांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्याचा अहवाल राखून ठेवला आहे. या सर्वांनी कोणते विष घेतले. ते कशातून घेतले, याचा अहवाल आल्यानंतर स्पष्ट होते.

अटक केलेल्यात सावकार, डाॅक्टर, शिक्षकाचा समावेशया आत्महत्याप्रकरणी केलेल्यात डाॅक्टर, शिक्षक, एसटीवाहकाचा समावेश आहे. तात्यासाहेब चौगुले हे वैद्यकीय डाॅक्टर, अनिल बोराडे हे शिक्षक, संजय बागडी हे मिरज आगारात एसटी वाहक, नंदकुमार पवार याचे बेकरी दुकान तर शैलेश धुमाळ याचा हाॅटेलचा व्यवसाय, प्रकाश पवार याचे स्टेशनरी दुकान आहे. तसेच गुन्हा दाखल असलेल्या खासगी सावकार शैलेश व आशिष धुमाळ याचाही समावेस आहे. दोघावर हद्दपारीची कारवाई झाली होती.

सात पथके रवानापोलिसांनी २५ पैकी १३ जणांना अटक केली आहे. उर्वरित संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची सात पथके तैनात करण्यात आली आहे. सांगली, कोल्हापूर, सोलापूर, कर्नाटक या परिसरात संशयितांचा शोध सुरू आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस