शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
2
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
3
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
4
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
5
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
6
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
7
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
8
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
9
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
10
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
12
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
13
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
14
विरार-अलिबाग कॉरिडॉर सहा जोडण्यांद्वारे महानगरांना कनेक्ट करणार; ७५ हेक्टरवरील ५०४३ खारफुटी बाधित होणार
15
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
16
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
17
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
18
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
19
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
20
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?

By संतोष कनमुसे | Updated: November 16, 2024 18:06 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभा मतदारसंघात यावेळी मोठी लढत होत आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) :  विधानसभा निवडणुकीत आता मोठी रंगत आली असून सोप्या वाटणाऱ्या लढती आता अवघड वाटत आहेत. शिराळा विधानसभा मतदारसंघातही हीच परिस्थिती आहे, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मानसिंगराव नाईक तर महायुतीकडून भाजपाचे नेते सत्यजीत देशमुख निवडणूक लढत आहेत. महायुतीला सम्राट महाडिक यांची बंडखोरी मागे घेण्यात यश आले आहे, यामुळे आता शिराळा विधानसभेतील लढतीला चुरस आली आहे. 

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...

महाविकास आघाडीने महायुतीच्या आधी मानसिंगराव नाईक यांच्या उमेदवारीची घोषणा केली. त्यांच्याविरोधात महायुती कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. महायुतीमध्ये भाजपाचे सम्राट महाडिक आणि सत्यजीत देशमुख या दोन्ही नेत्यांनी उमेदवारीची मागणी केली होती. भाजपाने सत्यजीत देशमुख यांना उमेदवारी दिली, यामुळे इच्छुक असलेले सम्राट महाडिक यांनी नाराजी व्यक्त करत अपक्ष अर्ज दाखल केला. यामुळे राजकीय वर्तुळात महाविकास आघाडीसाठी ही लढत सोपी असल्याच्या चर्चा सुरू झाल्या, महायुतीमधील मतविभागणी होऊन महाविकास आघाडीला याचा फायदा होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. पण काही दिवसातच महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी महाडिक यांची समजूत काढली, महाडिकांनी आपला अपक्ष अर्ज मागे घेत सत्यजीत देशमुख यांना पाठिंबा दिला. 

प्रचारात कुणाचं पारडं जड?

तिकीट जाहीर झाल्यापासूनच महाविकास आघाडी आणि महायुतीने प्रचाराला जोरदार सुरुवात केली. दोन्ही बाजूंनी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. महायुतीचे उमेदवार सत्यजीत देशमुख यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची जाहीर सभा झाली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सभा घेतली. तर महाविकास आघाडीच्या मानसिंगराव नाईक यांच्या प्रचारासाठी खासदार अमोल कोल्हे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर सभा घेतल्या आहेत. पाटील  यांनी वाळवा तालुक्यातील ४८ गावांमध्ये मोठ्या प्रमाणात सभा घेतल्या आहेत.दोन्ही बाजूंनी प्रचारात मोठा जोर आहे. 

शिराळा विधानसभा मतदारसंघातील प्रचारात महाविकास आघाडी आणि महायुतीने आघाडी घेतली आहे. मतदारसंघातील विकास, सहकार या दोन्ही मुद्द्यावरुन प्रचाराला रंगत आली आहे. पण या निवडणुकीत कोण बाजी मारेल हे सांगता येणार नाही, कारण दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचार सुरू आहे. 

२०१९ मध्ये मतांच गणित काय?

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून आमदार मानसिंगराव नाईक मैदानात होते त्यांच्याविरोधात शिवाजीराव नाईक भाजपचे उमेदवार होते. त्यावेळी सम्राट महाडिक यांनी बंडखोरी केली होती. महाडिक हे अपक्ष लढूनही त्यांना ४६ हजार मतदान झाले होते. २०१९ ला राष्ट्रवादी मानसिंगराव नाईक यांना १,०१,९३३ एवढी मत मिळाली होती तर शिवाजीराव नाईक यांना ७६,००२ मत मिळाली होती. तर दुसरीकडे यावेळी भाजपला भगतसिंग नाईक यांची ताकद मिळणार आहे.   

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sangli-acसांगलीElectionनिवडणूक 2024Mansingrao Naikमानसिंगराव नाईकSatyajit Deshmukhसत्यजित देशमुखMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुती