शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'लोकसभेला विशाल पाटील यांना मदत झाली, शिवसेनावाले क्षमा करा', भरसभेत बाळासाहेब थोरातांची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 13:02 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भरसभेत लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांना मदत झाल्याची कबुली दिली.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) :काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात काल सांगली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी सांगली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. यावेळी थोरात यांनी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना काँग्रेसची मदत झाल्याची जाहीर कबुली दिली.   

सांगलीत जाहीर सभेत बोलताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले, आताच लोकसभेची निवडणूक झाली. या लोकसभा निवडणुकीत आपल्या सगळ्यांची मदत विशाल पाटील यांना झालेली आहे, हे कोणाला नाकारता येणार नाही.तुमच्या सगळ्यांची मदत झालेली आहे, त्याशिवाय खासदार होऊ शकणार नाहीत, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले. 

मविआतील धुसफूस उघड! उद्धव ठाकरेंच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी बंडखोराला साथ; सुनील केदारांचा अजब दावा

बाळासाहेब थोरात म्हणाले, या वसंतदादा पाटील यांची पुण्याई सुद्धा उपयोगी आली असेल. परत विधानसभेची निवडणूक आली माझ्याकरता एक प्रश्न होता, एका बाजूला जयश्रीताई होत्या. मदन पाटील यांचे कुटुंब आणि हे पृथ्वीराजबाबा जवळचे त्यामुळे अशावेळेला निर्णय घेणे कठीण. प्रदेश काँग्रेस आणि अखिल भारतीय काँग्रेसलाही कठीण. पण हा सगळा विचार करत असताना तुमच्या सगळ्यांचे सहकार्य,  आता या ठिकाणी शिवसेनावाले बसले आहेत, आम्हाला क्षमा करा. सगळ्यांच्या मदतीनेच विशाल पाटील यांचा विजय झाला हे नाकारता येणार नाही. कारण त्यात तुमच्या सर्वांचे आशीर्वाद होते, अशी जाहीर कबुली बाळासाहेब थोरात यांनी सभेत दिली. 

"यावेळी आघाडीचे सरकार येणार, आमचा कोणही मुख्यमंत्री झाला तरीही चालतो मला काही अडचण नाही. पण, मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा फक्त आघाडीची होते. युतीची कधी चर्चा झाली का? त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाची चर्चा करावी, असा टोलाही बाळासाहेब थोरात यांनी महायुतीवर लगावला.

सांगली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने काँग्रेसच्या पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिली आहे, महायुतीने भाजपा नेते सुधीर गाडगीळ यांना उमेदवारी दिली आहे.  तर काँग्रेसच्या जयश्री पाटील यांनी बंडखोरी केली आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात सांगली विधानसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरू आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातElectionनिवडणूक 2024sangli-acसांगली