शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'अलमट्टी' उंची वाढीला विरोध करण्यात महाराष्ट्र पिछाडीवर - विशाल पाटील; वडनेरे समितीचा अहवाल कर्नाटकसाठी पोषक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 19:14 IST

तीन जिल्ह्यांत कडकडीत बंद पाळू : अरुण लाड

सांगली : माजी जलसंपदा सचिव नंदकुमार वडनेरे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीनेच अलमट्टी धरणामुळेसांगली व कोल्हापूर जिल्ह्यांना पूर येत नाही, असा अहवाल दिला. हा अहवालच अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यासाठी कर्नाटकला पोषक आहे. अलमट्टी धरणामुळे पूर येतो, असे म्हणण्यासाठी एकही अहवाल महाराष्ट्र सरकारकडे नाही, असा आरोप सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी केला. त्यामुळेच केंद्र सरकारकडे अलमट्टीविरोधात भूमिका मांडताना अडचणी येत आहेत, असेही ते म्हणाले.अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यासाठी कर्नाटक सरकारकडून हालचाली चालू आहेत. या प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अरुण लाड यांच्या अध्यक्षतेखाली सांगलीत लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीस आमदार रोहित पाटील उपस्थित होते.

विशाल पाटील म्हणाले, कर्नाटक सरकारला अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यासाठी यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे. त्याविरोधात महाराष्ट्र सरकारने एकही याचिका दाखल केलेली नाही. याबद्दल महाराष्ट्राच्या जलसंपदा मंत्र्यांनाही माहिती नाही, हे त्यापेक्षाही धक्कादायक आहे. मुळात महाराष्ट्राच्या वाट्याचे पाणी अडवण्यात आपण खूपच मागे पडलो आहोत. तसेच अलमट्टी धरणामुळे खरेच सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना पूर येतो का? हे मांडण्यातही महाराष्ट्र सरकार खूपच मागे आहे.

पुन्हा तज्ज्ञ समिती नेमण्याची गरजअलमट्टी धरणामुळेच पूर येतो, हे सिद्ध करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुन्हा एक तज्ज्ञांची समिती नेमण्याची गरज आहे. या समितीचा अहवाल काय येईल, त्या माहितीवरच आपणास पुन्हा केंद्र शासनाकडे महाराष्ट्राची बाजू मांडता येईल. तसेच सर्वोच्च न्यायालयातही आपल्याला जाता येणार आहे, असेही विशाल पाटील म्हणाले.

तीन जिल्ह्यांत कडकडीत बंद पाळू : अरुण लाडअलमट्टी धरणाची उंची वाढविण्यासाठी कर्नाटक सरकारने सर्व तयारी केली आहे. याविरोधात महाराष्ट्र सरकार काहीच करत नाही. या झोपी गेलेल्या महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत एक दिवस कडकडीत बंद पाळण्यात येईल. याबाबतची लवकरच तारीख निश्चित करण्यात येईल, असे आमदार अरुण लाड यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीKarnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्रDamधरण