महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:25 IST2021-03-15T04:25:15+5:302021-03-15T04:25:15+5:30

बेळगावात शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या गाडीवर हल्ला व कोल्हापुरात एस.टी.वर दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यांत तणाव निर्माण झाल्याने कर्नाटकात जाणाऱ्या ...

Maharashtra-Karnataka bus service resumes | महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा पुन्हा सुरू

महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा पुन्हा सुरू

बेळगावात शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या गाडीवर हल्ला व कोल्हापुरात एस.टी.वर दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यांत तणाव निर्माण झाल्याने कर्नाटकात जाणाऱ्या एस.टी. बसेस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. शनिवारी दोन्ही राज्यांत कर्नाटक महाराष्ट्र बससेवा बंद करण्यात आली. मिरजेत येणाऱ्या कर्नाटक एस.टी.च्या फेऱ्या व मिरज आगाराच्या कर्नाटकात जाणाऱ्या एस.टी. फेऱ्या बंद झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. रविवारी दोन्ही राज्यातील एस.टी. अधिकाऱ्यांनी बंद केलेली एस.टी. सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. यामुळे रविवारी दुपारपासून मिरजेत कर्नाटकातून येणाऱ्या बसेसची वर्दळ सुरू झाली. मिरज आगारातून जमखंडी व जिल्ह्यातील इतर आगाराच्याही कर्नाटकात फेऱ्या सुरू झाल्या. दोन्ही राज्यांत एस.टी. सुरू झाल्याने मिरज बसस्थानकात गर्दी होती.

Web Title: Maharashtra-Karnataka bus service resumes