शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदाची बातमी! ऑफिस आवर्सनंतर बॉस फोन करून त्रास देऊ शकणार नाही; लेबर कोडनंतर संसदेत मोठी तयारी...
2
Video: उद्योगपतीच्या मुलीच्या लग्नात ३ खासदारांचा स्टेजवर डान्स; 'ओम शांती ओम' गाण्यावर थिरकले
3
अग्नितांडव! २५ जणांचा जीव घेणारा क्लब 'असा' होता; आत-बाहेर येण्यासाठी एकमेव लाकडी पूल अन्...
4
अलास्का-कॅनडा सीमेवर ७.० तीव्रतेचा भूकंप; धक्क्याने हादरली अमेरिका
5
सुमारे १५७३ लोकांनी 'वेट लॉस इंजेक्शन' बंद केले, वजन पुन्हा वाढू लागले? संशोधनात धक्कादायक खुलासा
6
स्वस्त तिकीट, झिरो कॅन्सिलेशन फी, मोफत अपग्रेड..; Indigo संकट काळात Air India चा मोठा निर्णय
7
Goa Nightclub Fire:शुक्रवारची रात्र असती तर...! गोव्यातील त्या क्लबमध्ये हाहाकार उडाला असता; नाताळ, थर्टीफर्स्टपूर्वी पर्यटकांत खळबळ...
8
इंडिगोच्या गोंधळानंतर सरकारचा कठोर निर्णय; विमान भाड्याची कमाल मर्यादा निश्चित, रिफंडसाठी अल्टीमेट
9
भारत-अमेरिका संबंधांवर पुतीन भेटीमुळे फरक नाही; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे ठाम प्रतिपादन
10
धारावी-घाटकोपर जलबोगद्याला मंजुरी; सांडपाणी प्रकल्पात प्रक्रिया केलेले पाणी वाहून नेण्यास गती
11
धक्कादायक! 'मेड इन इंडिया' Hyundai Nios ला GNCAP क्रॅश टेस्टमध्ये 'झिरो' स्टार रेटिंग
12
भारतातूनच परतताच पुतिन यांच्यासाठी खूशखबर, रशियाला मिळाली मोठी ऑफर; अमेरिकेची झोप उडाली
13
काय सांगता! 'या' देशात पुरुषांची लोकसंख्या घटली; पती भाड्याने घेण्याची महिलांवर आली वेळ
14
स्फोटानंतर घाबरून बेसमेंटमध्ये पळाले लोक; २० जणांचा तिथेच गुदमरून जीव गेला, आतापर्यंत २५ मृत्यू
15
झोंबणाऱ्या थंडीनं भरलं कापरं, उत्तर भारतात थंडीची लाट; उत्तराखंड, हिमाचलमध्ये बर्फवृष्टीचा इशारा
16
Goa Nightclub Fire: शनिवारची रात्र, गोव्यात क्लबमध्ये सिलिंडर स्फोट; २५ मृतांमध्ये चार पर्यटक, उर्वरित नाईट क्लबचा स्टाफ...
17
आदिवासी, ओबीसींचा वेगळा विदर्भ व्हायला हवा; विजय वडेट्टीवार : काँग्रेस श्रेष्ठींकडे पाठपुरावा करणार
18
विरोधी पक्षनेता नसेल तर उपमुख्यमंत्रिपदही रद्द करा; उद्धव ठाकरे : सरकार विरोधी पक्षाला घाबरते का?
19
दिल्लीत PM नरेंद्र मोदी अन् राज ठाकरे एकत्र; मुलगा अमित अन् नातू किआननं मोदींसोबत काढला फोटो
20
Goa Nightclub Fire: गोव्यातील क्लबमध्ये भीषण आग, २५ जणांचा मृत्यू; सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता, CM कडून चौकशीचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 14:47 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सांगली येथे जाहीर सभा घेतली.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : 'काँग्रेसचे अध्यक्षच सांगतात काँग्रेस जी आश्वासनं देतं ती काल्पनिक आहेत, ती कधीच पूर्ण होणार नाहीत. पण मी आज तुम्हाला सांगतो, मोदींनी जी आश्वासने दिलीत ती आम्ही पूर्ण केली आहेत. महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायचे, उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला तर काँग्रेसमध्ये डझनभर नेते मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत,  असा खोचक टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाविकास आघाडीवर केला. विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आज शिराळा येथे जाहीर सभा घेतली. यावेळी शाह यांनी विरोधकांवर निशाणा साधला. 

महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

शिराळा येथील सभेत बोलताना अमित शाह म्हणाले,  मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्र नंबर वन होऊ शकतो. मी  मागील महिन्यात महाराष्ट्रातील प्रत्येक भागात फिरलो, त्या सगळीकडे एकच चर्चा आहे, महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे आहे, केंद्रात भाजपाचे सरकार आहे, राज्यात महायुतीचे सरकार बनवा. हे दोन्ही सरकार महाराष्ट्राला नंबर एकचे राज्य बनवायचे काम करतील, असंही अमित शाह म्हणाले. 

"औरंगाबादचे नाव संभाजीनगर व्हायला पाहिजे, पण आघाडीवाले याला विरोध करत आहेत. उद्धव ठाकरेंचा याला विरोध आहे, शरद पवार तुम्ही कितीही जोर लावा आम्ही औरंगाबादला संभाजीनगर हे नाव देणारच, असा टोलाही शाह यांनी शरद पवार यांना लगावला. जम्मू काश्मीरमध्ये ३७० कलम पुन्हा आणण्याचा यांचा प्रयत्न आहे, पण आम्ही तो पुन्हा येऊ देणार नाही. काही दिवसापूर्वी मोदींनी वक्फ बोर्डाचे विधेयक आणले या विधेयकालाही या लोकांनी विरोध केला. आघाडीचे सरकार जर सत्तेत आले तर शेतकऱ्यांची जमीन वक्फ बोर्डाच्या नावावर होईल. आम्ही शेतकऱ्यांच्या जमिनीला हात लावू देणार नाही, असंही शाह म्हणाले.

शरद पवार यांच्यावर साधला निशाणा

अमित शाह म्हणाले, आम्ही अयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली. यावेळी आम्ही शरद पवार आणि राहुल गांधींना बोलावले पण त्यांनी पुन्हा अयोध्येत येईन असं सांगितलं. पण अजूनही ते अयोध्येला गेलेले नाही, त्यांना त्यांच्या व्होट बँकेचे भीती वाटते म्हणून ते अजूनही अयोध्येला गेलेले नाही, असा टोलाही अमित शाह यांनी लगावला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Amit Shahअमित शाहSangliसांगलीBJPभाजपाSharad Pawarशरद पवार