शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

राजा सावध हो!, निष्ठावंत कार्यकर्त्यांची संजयकाका पाटील यांना साद; सोशल मीडियावरील पोस्टची सर्वत्र चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 18:19 IST

माजी खासदार संजय पाटील यांना लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभेतही पराभवाचा सामना करावा लागला

दत्ता पाटीलतासगाव : माजी खासदार संजय पाटील यांना लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. लोकसभेला गाफीलपणा नडला, मात्र विधानसभेला पोटतिडकीने पळून देखील पराभव झाल्यामुळे हा पराभव निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे.सध्या सोशल मीडियावर काका समर्थकांची पोस्ट व्हायरल झाली आहे. त्या पोस्टमध्ये गद्दारीची चर्चा होत आहे. संजय पाटील यांना उद्देशून 'राजा, पटावरील सोंगट्या बदलण्याची वेळ झाली.' अशी साद संजय पाटील यांना घालण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपकडून संजय पाटील निवडणुकीच्या रिंगणात होते. कार्यकर्त्यांना ते हॅट्ट्रिक करतील, असा आत्मविश्वास होता. मात्र या निवडणुकीत विजयी होणारच, हा त्यांच्या समर्थकांचा गाफिलपणा नडला. परिणामी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.विधानसभा निवडणुकीत राजकीय अस्तित्वासाठी संजय पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. त्यांना माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी साथ दिली. लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुकीतून बोध घेत पहिल्या टप्प्यापासूनच नियोजनबद्धपणे विधानसभेसाठी रणनीती आखली. निकालानंतर अपवाद वगळता बहुतांश गावांतून अनपेक्षितपणे बॅकफूटवर राहावे लागले. अनेक हक्कांच्या गावांतही मताधिक्य मिळाले नाही. काठावर असलेल्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला.

या पराभवाची कारणमीमांसा होत असतानाच संजय पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल करण्यात आली. या पोस्टमध्ये निष्ठावंत कार्यकर्ता जिवाच्या आकांताने संजय काकांच्या विजयासाठी पळाल्याचा संदर्भ आहे. बुद्धिबळाच्या खेळाचा संदर्भ देत प्यादी पळाली असली तरी हत्ती, घोडे, उंट यांनी गंमत बघितली. तर वजिरांनी गद्दारी केल्याची टीका केली आहे. येणाऱ्या काळात तरी संजय पाटील यांनी सावध होऊन पटावरील सोंगट्या बदलण्याची वेळ झाल्याचेही म्हटले आहे. या पोस्टमुळे तालुक्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.सोशल मीडियावरील पोस्टचीच सर्वत्र चर्चा‘जिवाच्या आकांताने फक्त प्यादी पळाली. हत्ती, घोडे, उंट गंमत बघत राहिले. तुमचेच आहोत असं भासवून वजिरांनी सरळ सरळ गद्दारी केली. राजा आता तरी सावध हो, पटावरील सोंगट्या बदलण्याची वेळ झाली..!’ अशी पोस्ट संजय पाटील यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सध्या या पोस्टचीच सर्वत्र चर्चा सुरू आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४tasgaon-kavathe-mahankal-acतासगाव-कवठेमहांकाळsanjaykaka patilसंजयकाका पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024