शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाचा कलंक पुसणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 12:26 IST

जत : भाजपा महायुती शासनाने जलसंपदा विभागाची कामे हाती घेऊन जत तालुक्याचा दुष्काळाचा कलंक पुसण्याचा प्रयत्न केला. आणखी विकासकामे ...

जत : भाजपा महायुती शासनाने जलसंपदा विभागाची कामे हाती घेऊन जत तालुक्याचा दुष्काळाचा कलंक पुसण्याचा प्रयत्न केला. आणखी विकासकामे मार्गी लागण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जत येथील सभेत केले.जत विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या प्रचाराला देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सुरवात केली. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री सुरेश खाडे, भाजपचे जतचे उमेदवार आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, जिल्हाध्यक्ष दीपक म्हैसाळकर-शिंदे, दौलत शितोळे, डॉ. रवींद्र आरळी, माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर, राष्ट्रवादीचे सुनील पवार, पप्पू डोंगरे, आर. के. पाटील, आरपीआयचे संजय कांबळे उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, मी २०२२ मध्ये जलसंपदा विभागाचा मंत्री झालो. राज्यातील दुष्काळी भागातील अनेक प्रकल्प हाती घेतले. त्यामुळे भविष्यात अख्खा महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् होणार आहे. तुम्हाला ‘शब्द’ देतो, आताच्या पिढीने दुष्काळ पहिला असेल, मात्र येणारी पिढी ही दुष्काळ पाहणार नाही. कृष्णा व कोयना उपसा सिंचन योजना ८ हजार २७२ कोटी, तर विस्तारित म्हैसाळ योजनेला दोन हजार कोटींचा निधी दिला आहे. त्यामुळे जत तालुक्यातील ६४ गावांचा दुष्काळ कायमस्वरूपी मिटणार आहे.

राज्यातील सौरऊर्जावरील पहिला म्हैसाळ प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या योजनेला दोनशे मेगावॅट वीज लागते. ही वीज या प्रकल्पातून दिला जाणार आहे. शेतकऱ्यांना पाणी, वीज मोफत देणार असून त्यांची कर्जमाफीदेखील केली जाणार आहे. मी पहिल्या विधानसभा मतदारसंघात प्रचार शुभारंभ करण्याऐवजी शेवटच्या २८८ व्या जत मतदारसंघाला एक नंबरचा मतदारसंघ करण्यासाठी आलो आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

भारत जोडो नाही, तर तोडो आंदोलन..आज राहुल गांधी महाराष्ट्रात आलेत. ते ज्या पद्धतीची मोट बांधतायेत, ती महाराष्ट्रासाठी व देशासाठी घातक आहे. कारण भारत जोडोमध्ये ज्या संघटना आहेत, त्यातील काही संघटना अराजकता पसरवणाऱ्या आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांचे भारत जोडो नाही, तर भारत तोडो आंदोलन आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४jat-acजाटDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसdroughtदुष्काळwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024