शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha Election 2024: पलूस-कडेगाव मतदारसंघात विश्वजित कदम यांची हॅट्ट्रिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 18:15 IST

संग्रामसिंह देशमुख यांचा पराभव 

कडेगाव : राज्यभरात पडझड झाली असताना पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात मात्र काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी ३० हजार ६४ इतके मताधिक्य घेऊन हॅट्ट्रिक साधली आहे. त्यांनी भाजप महायुतीचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा पराभव करून पलूस कडेगावचे 'विश्व' जिंकले. कडेगाव येथील आयटीआय इमारतीत शनिवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. पहिल्या फेरीत संग्राम देशमुख यांनी ४५६ मतांनी विश्वजित कदम यांच्यावर मतांनी आघाडी घेतली. पहिल्या १० फेऱ्यांत कडेगाव तालुक्यातील गावांचा समावेश होता. कडेगाव तालुक्यात विश्वजीत कदम यांनी ९ हजार ६६८ इतके मताधिक्य घेतले. त्यानंतर, ११ व्या फेरीपासून २१ व्या फेरीपर्यंत पलूस तालुक्यातील गावांचा समावेश झाला. पहिली फेरीवगळता अन्य सर्व फेऱ्यांमध्ये डॉ. कदम यांचे मताधिक्य वाढत राहिले. २१ व्या फेरीअखेर निकाल जाहीर झाला त्यावेळी विश्वजीत कदम यांचे २८ हजार ८४३ इतके मताधिक्य झाले. टपाली व सैनिकांच्या मतांमध्ये विश्वजित कदम यांनी १२२१ इतके मताधिक्याचा समावेश झाल्यानंतर त्यांनी अखेर ३० हजार ६४ इतके मताधिक्य मिळवले. त्यामध्ये पलूस तालुक्याने १९ हजार १७५ मताधिक्य देऊन विश्वजित कदम यांच्या विजयात मोलाचे योगदान दिले. निकालानंतर, निवडणूक निर्णय अधिकारी रणजित भोसले यांनी डॉ. विश्वजित कदम यांना प्रमाणपत्र दिले. यावेळी आमदार मोहनराव कदम,महेंद्र लाड यांचेसह कुटुंबीय उपस्थित होते.

विजयाची कारणे

  • १२०० कोटींच्या निधीच्या माध्यमातून मतदारसंघातील विकासकामे.
  • आमदार अरुण लाड, शरद लाड यांनी दिला पाठिंबा, उद्धवसेनेची साथ
  • शिक्षण व सहकार क्षेत्रातील संस्थात्मक जाळे

पराभवाची कारणे

  • मागील दोन निवडणुका न लढल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांची घडी विस्कटली.
  • भाजपच्या सत्ताकाळात महागाई आणि बेरोजगारीची समस्या वाढली.
  • लहान गावांमध्ये प्रचार सभांचा अभाव जाणवला.

उमेदवार :पक्ष व पडलेली मते

  • डॉ.विश्वजित कदम : काँग्रेस : १ लाख ३० हजार ७६९
  • संग्रामसिंह संपतराव देशमुख : भाजप : १ लाख ७०५
  • आनंदा शंकर नालगे-पाटील : बळिराजा पार्टी : २९९
  • अंकुश वसंत पाटील : जनहित लोकशाही पार्टी : १७६
  • जीवन करकटे वंचित बहुजन आघाडी : ५५६
  • नोटा : ८९९
टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024palus-kadegaon-acपलूस कडेगावcongressकाँग्रेसVishwajeet Kadamविश्वजीत कदमBJPभाजपाwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024