शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बालेकिल्ला कोणाचा?; सांगली जिल्ह्यात क्रमांक एकच्या खुर्चीसाठी तीन पक्षांत स्पर्धा

By अविनाश कोळी | Updated: November 16, 2024 18:32 IST

बाहुबल वाढविण्यासाठी नेते सरसावले

अविनाश कोळीसांगली : जिल्ह्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सरळ सामना होत असला तरी पक्षीय स्तरावर जिल्ह्यात क्रमांक एकवर जाण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व काँग्रेसमध्ये स्पर्धा रंगली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील तिन्ही पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी ताकद लावली आहे. जागा वाटपावेळी ही या तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु होती.महायुतीमधून यंदा जिल्ह्यातील आठपैकी सर्वाधिक पाच जागांवर भाजप लढत आहे. महाविकास आघाडीत सर्वाधिक चार जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला आल्या आहेत. काँग्रेसही तीन जागा लढवत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाला दोन तर दोन्ही सेनेला प्रत्येकी एक जागा वाट्याला आली आहे. त्यामुळे क्रमांक एकच्या शर्यतीत सध्या भाजप, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व काँग्रेस हे तीनच पक्ष दिसत आहेत. यात कोणाच्या पदरात किती यश मिळणार, याची चर्चा आता रंगली आहे.पूर्वी सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतरही हा पक्ष बऱ्याचदा क्रमांक एकवर राहिला. त्यानंतर हा गड काहीवेळा भाजपच्या ताब्यातही गेला आहे. आता या आठही मतदारसंघात सर्वाधिक बाहुबल कोणाचे राहील, हा चर्चा प्रश्न आहे.

सध्या क्रमांक एकवर कोण?जिल्ह्यात पक्ष विभाजनानंतर ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष क्रमांक एकवर आहे. त्यांच्याकडे ३, भाजप व काँग्रेसकडे प्रत्येकी २ तर शिंदेसेनेकडे १ असे पक्षीय बलाबल आहे.

पूर्वीचे पक्षीय बलाबल कसे होतेवर्ष - भाजप - राष्ट्रवादी - काँग्रेस - शिवसेना - अपक्ष२०१४ - ४ -२ - १ - १ - ०२००९ - ३ - २  - २ - १२००४ - १ - २  - ३ - ३१९९९ - ० - ४ - ४ - १

नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

  • सांगली जिल्ह्यात पक्ष क्रमांक एकवर नेण्यासाठी दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सध्याची त्यांच्या पक्षाची क्रमांक एकच खुर्ची राखण्याचे आव्हान आहे.
  • दुसरीकडे भाजपला २००९ व २०१४ च्या निवडणुकीप्रमाणे पुन्हा अव्वल राहायचे आहे. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताकद लावली आहे.
  • आजवरच्या सर्व विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वाधिक काळ क्रमांक एकच्या खुर्चीचा मान काँग्रेसला मिळाला आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते आमदार विश्वजीत कदम यांच्यासमोर हा बालेकिल्ला पुन्हा मिळविण्याचे आव्हान असेल.

महाआघाडी विरुद्ध महायुतीची स्पर्धासध्याचे पक्षीय बलाबल पाहता महाविकास आघाडीकडे पाच, तर महायुतीकडे तीन आमदार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी व महायुतीत ही बाहुबल वाढविण्याची स्पर्धा रंगली आहे. त्यामुळे दोन्हीकडील नेते मित्रपक्षांच्या उमेदवारासाठी ही ताकद लावताना दिसत आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sangli-acसांगलीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024