शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

'पलूस-कडेगाव'ची एकतर्फी निवडणूक बनली चुरशीची; विश्वजित कदम-संग्रामसिंग देशमुख यांच्यात लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 19:00 IST

प्रमोद पाटील किर्लोस्करवाडी : पलूस-कडेगाव मतदारसंघाची निवडणूक एकतर्फी होणार, असा काँग्रेसचा होरा होता. पण आता ही निवडणूक चुरशीची होत ...

प्रमोद पाटीलकिर्लोस्करवाडी : पलूस-कडेगाव मतदारसंघाची निवडणूक एकतर्फी होणार, असा काँग्रेसचा होरा होता. पण आता ही निवडणूक चुरशीची होत आहे. कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. विश्वजित कदम यांच्यासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांपासून आजी-माजी खासदार यांच्या सभा होत आहेत. तर संग्रामसिंग देशमुख यांच्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस सभा घेणार आहेत.गेल्या निवडणुकीत युतीमध्ये ही जागा शिवसेनेकडे होती. विरोधकांचे डिपॉझिट जप्त झाले. तसेच, विरोधकांपेक्षा नोटाला जादा मते मिळाली. त्यामुळे डॉ. विश्वजित कदम यांनी ही निवडणूक एकतर्फी व उच्चांकी फरकाने जिंकली होते. यावेळी मात्र ही जागा भाजपकडे गेल्याने पारंपरिक प्रतिस्पर्धी कदम व देशमुख अशी सरळ लढत होत आहे.डॉ. कदम यांनी भारती विद्यापीठ, सोनहिरा साखर कारखाना, दोन्ही सूत गिरण्या आदींच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला आहे. विकासकामांच्या बळावर ते आपला विजय निश्चित मानत आहेत. तर गतवेळी पेक्षा जादाचे मताधिक्य देण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार आहे. काहीअशी नाराज असणारा शरद पवार गट खासदार सुप्रिया सुळे यांच्या सभेनंतर एकदिलाने कामाला लागल्याचे दिसून येत आहे. आमदार अरुण लाड हे प्रचारात सक्रिय झाले आहेत.

महायुतीचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांनी घरोघर प्रचारावर भर दिला आहे. त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष कार्यकाळात केलेली विकासकामे, केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या कामांची माहिती ते देत आहेत. त्यांच्यासोबत संपूर्ण देशमुख कुटुंबीय मैदानात उतरले आहेत. सध्या तरी त्यांनी मोठ्या सभांना बगल देऊन वाड्या-वस्त्यांवर जाऊन मतदारांच्या गाठीभेटींवर भर दिला आहे. त्यांनाही घटक पक्ष असलेले शिंदेसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस साथ देताना दिसत आहे.

२०१९ च्या निवडणुकीतील चित्रउमेदवार - पक्ष - मिळालेली मतेडॉ. विश्वजित कदम - कॉंग्रेस - १,७१,४९७संजय विभुते - शिवसेना - ८,९७६नोटा मतदान - २०,६५१

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४palus-kadegaon-acपलूस कडेगावVishwajeet Kadamविश्वजीत कदमBJPभाजपाwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024