महापुरावर कायमस्वरुपी उपाययोजना गरजेची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:28 IST2021-09-18T04:28:40+5:302021-09-18T04:28:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : महापुरामुळे लोकांचे मोठे नुकसान होत असून, यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. प्रत्येक संकटाच्या ...

महापुरावर कायमस्वरुपी उपाययोजना गरजेची
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : महापुरामुळे लोकांचे मोठे नुकसान होत असून, यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. प्रत्येक संकटाच्या काळामध्ये शिवाजीराव देशमुख यांनी लोकांना मदतीचा हात देण्याची शिकवण दिली असून, आम्ही नेहमीच लोकांच्या पाठीशी राहण्याची भूमिका घेतली आहे, असे प्रतिपादन निनाईदेवी शिक्षण संस्थेच्या सचिव रेणुकादेवी सत्यजित देशमुख यांनी केले.
देववाडी (ता. शिराळा) येथे महापुरामध्ये नुकसान झालेल्या ३८१ कुटुंबीयांना ब्लँकेटचे वाटप रेणुकादेवी देशमुख यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी भाजप महिला जिल्हा अध्यक्षा डॉ. उषाताई दशवंत, सरचिटणीस संगीता साळुंखे प्रमुख उपस्थित होत्या.
रेणुकादेवी देशमुख म्हणाल्या, देववाडी गावाचे महापुरात मोठे नुकसान झाले आहे. गावातील शेतीचेदेखील प्रचंड नुकसान झाले. शेतकरी अडचणीत आहे. अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.
यावेळी अभिजित खोत, बाळाराम शेवडे, गजानन शिंदे, आदित्य खोत, कुबेर मोरे, तानाजी खोत, सर्जेराव खांबे, बाळासोा खोत, अशोक खोत, जयसिंग वरेकर, शंकर खोत, विलास मोरे उपस्थित होते.