‘महालक्ष्मी’मुळे महिलांच्या उद्योगशीलतेला चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:28 IST2021-02-16T04:28:07+5:302021-02-16T04:28:07+5:30

वाळवा : महालक्ष्मी शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांच्या उद्योगशीलतेला चालना मिळून हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे, असे ...

‘Mahalakshmi’ promotes women's entrepreneurship | ‘महालक्ष्मी’मुळे महिलांच्या उद्योगशीलतेला चालना

‘महालक्ष्मी’मुळे महिलांच्या उद्योगशीलतेला चालना

वाळवा : महालक्ष्मी शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांच्या उद्योगशीलतेला चालना मिळून हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन सिनेअभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी केले.

वाळवा येथील हुतात्मा स्मारकमध्ये महिलांसाठी आयोजित हळदी-कुंकू समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. समारंभाच्या अध्यक्षस्थानी निमंत्रक व महालक्ष्मी शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रवर्तक स्नेहल गौरव नायकवडी होत्या.

जिल्हा परिषदेच्या सदस्या प्राचार्या डाॅ. सुषमा नायकवडी, नंदिनी वैभव नायकवडी, सरपंच डाॅ. शुभांगी माळी, दिपाली शिंदे, प्रमिला यादव, अनिता माने, लता पडळकर, पंचायत समिती सदस्या वैशाली जाधव, अपर्णा साळुंखे उपस्थित होत्या.

प्राजक्ता गायकवाड म्हणाल्या, या परिसरातील द्राक्षे व केळी प्रसिद्ध आहेत. या उत्पादनांवर महालक्ष्मी कंपनीच्या वतीने प्रक्रिया करून जास्तीत जास्त पैसे उत्पादकांना मिळवून दिले जातील. ज्या पद्धतीने हुतात्मा साखर कारखाना हुतात्मा पॅटर्न म्हणून नावारूपाला आला, तसेच ही हुतात्मा उद्योग समूहाचीच महालक्ष्मी शेतकरी उत्पादक कंपनी जगाच्या पाठीवर नावारूपाला येईल यात काही शंका नाही.

Web Title: ‘Mahalakshmi’ promotes women's entrepreneurship