शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Politics: भाजप प्रवेशावरुन मदनभाऊ गटात फूट, जयश्रीताईसोबत जाण्यास नकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 13:44 IST

काही प्रमुख शिलेदार नाराज

सांगली : जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री मदन पाटील यांनी काँग्रेसला रामराम करून बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये गेले आहेत. पण, काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि दोन नगरसेवकांनी भाजपमध्ये जाण्यास नकार दिला आहे. यामुळे मदन पाटील गटात भाजप प्रवेशावरून फूट पडल्याचे दिसत आहे.वसंतदादा पाटील यांच्या नातसून, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे मदनभाऊ गटात फूट पडल्याचे दिसत आहे. काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मदनभाऊ गटापासून फारकत घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असता तर आम्ही त्यांच्यासोबत कायम राहिलो असतो, असे काही कार्यकर्त्यांकडून सांगितले जात आहे.केवळ सांगलीच नव्हे, तर मिरज आणि कुपवाडमध्येही माजी मंत्री मदन पाटील यांनी कार्यकर्त्यांची चांगली मोट बांधली होती. मागासवर्गीय, मुस्लीम आणि ख्रिश्चन समाजातील तरुणांची फळीही मदनभाऊ गटात कार्यरत होती. मदन पाटील यांच्या पश्चात हे सर्वजण जयश्रीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहिले.

जयश्री पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, अशी इच्छा अनेक कार्यकर्त्यांची होती, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा पर्याय निवडावा, अशी भावना काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. अजित पवार हेही महायुतीत सत्तेत आहेत. राजकीय बळ मिळण्यासाठी तसेच वसंतदादा शेतकरी बँकेच्या वसुली प्रकरणातही अजित पवार यांची मदत होईल, अशा काही कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया होत्या.मात्र मदनभाऊ गटातील प्रमुख नेते, कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर जयश्रीताई यांनी भाजपमध्ये प्रवेशाचा निर्णय घेतला, अशी चर्चा आहे. पण, मदनभाऊ गटाचे कट्टर समर्थक जिल्हा बँकचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. सिकंदर जमादार, माजी नगरसेवक फिरोज पठाण, तौफिक शिकलगार, काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष कय्युम पटवेगार, युनूस महात या मदनभाऊ गटाच्या प्रमुख शिलेदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला नाही.

कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार : सिकंदर जमादारजयश्री पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आमचा गट त्यांच्यासोबत गेला नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करून काँग्रेसमध्ये थांबायचे की अन्य कोणत्या पक्षात जावे, याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रा. सिकंदर जमादार यांनी दिली.