सांगलीत कमळ अचानक 'अवतरला'; पक्षीप्रेमी आनंदले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 18:26 IST2021-05-25T18:26:36+5:302021-05-25T18:26:51+5:30
Lotus Bird (Jacana) सांगलीत शामरावनगरच्या दलदलीत आढळलेला कमळ पक्षी

सांगलीत कमळ अचानक 'अवतरला'; पक्षीप्रेमी आनंदले
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरी रहिवासापासून दुरावलेला कमळ पक्षी सांगलीत मंगळवारी अचानक दिसला. शामरावनगरमधील दलदलीत किडे टिपताना पक्षीप्रेमींना त्याचे दर्शन झाले. सुमारे दहा वर्षांनंतर तो सांगलीत आढळल्याची माहिती पक्षी अभ्यासक ॲड. फिरोज तांबोळी यांनी दिली. (Lotus Bird (Jacana) seen in Sangali)
दलदलीची ठिकाणे कमी झाल्याने हा पक्षी शहरापासून दुरावला आहे. कृष्णेच्या काठावर कधीकधी दिसायचा, पण गेल्या दहा वर्षांत तो अचानक गायब झाला. गेल्या दोन वर्षांत शामरावनगरमध्ये पुराचे पाणी शिरुन बरीच दलदल निर्माण झाली आहे. देशी व स्थलांतरीत विदेशी पक्ष्यांसाठी ही दलदल म्हणजे अन्न मिळविण्यासाठी हक्काची जागा ठरली आहे. ॲड. तांबोळी सहकाऱ्यांसमवेत तेथे पक्षी निरिक्षण करत असताना कमळ पक्ष्यांचा थवा दिसला. आठ ते दहा पक्षी गेल्या काही दिवसांपासून तेथे येत असावेत असे तांबोळी म्हणाले. लांब शेपटीचा कमळ पक्षी अत्यंत देखणा व सभ्य पक्षी मानला जातो.