वसंतदादा कारखान्याचा तोटा ३१७ कोटींवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 20:03 IST2017-09-29T20:03:11+5:302017-09-29T20:03:38+5:30
सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा तोटा ३१७ कोटी ३९ लाख ५६ हजार ४७१ रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

वसंतदादा कारखान्याचा तोटा ३१७ कोटींवर
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा तोटा ३१७ कोटी ३९ लाख ५६ हजार ४७१ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. शुक्रवारी सर्वसाधारण सभेत वाढत्या तोट्याबाबत सभासदांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. दरम्यान, ऊस उत्पादकांची वर्षातील बिले गळीत हंगामापूर्वी मिळतील, असा विश्वास संचालक मंडळाने व्यक्त केला.
वसंतदादा कारखान्याची ६० वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कारखाना दि. ३१ मार्च २०१६ अखेरीस २७० कोटी ३२ लाख ७९ हजार ६०९ रुपये तोट्यात होता. मागील गळीत हंगामामध्ये कारखान्यास पुरेसा ऊस उपलब्ध झाला नसल्याने एका वर्षात ४७ कोटी सहा लाख ७६ हजार ८६२ रुपयांची भर त्यात पडली आहे. त्यामुळे ३१ मार्च २०१७ अखेर तोट्याचा आकडा ३१७ कोटी ३९ लाख ५६ हजार ४७१ रुपयांपर्यंत पोहोचल्याचे अहवालात नमूद केले आहे.