ऑक्सिजन गॅसपुरवठा बंदमुळे उद्योगांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:29 IST2021-05-27T04:29:10+5:302021-05-27T04:29:10+5:30

कुपवाड : जिल्ह्यातील फॅब्रिकेशन, फौंड्री, इंजिनिअरिंग यासह अनेक उद्योगांना लागणारा ऑक्सिजन गॅसपुरवठा गेल्या दीड महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे उद्योग ...

Loss of industry due to shutdown of oxygen gas supply | ऑक्सिजन गॅसपुरवठा बंदमुळे उद्योगांचे नुकसान

ऑक्सिजन गॅसपुरवठा बंदमुळे उद्योगांचे नुकसान

कुपवाड : जिल्ह्यातील फॅब्रिकेशन, फौंड्री, इंजिनिअरिंग यासह अनेक उद्योगांना लागणारा ऑक्सिजन गॅसपुरवठा गेल्या दीड महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. या उद्योगांना लागणारा ऑक्सिजन गॅसपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

मालू यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे शासनाने उद्योगक्षेत्राचा ऑक्सिजन पुरवठा बंद करून तो आरोग्यासाठी वापरा, असे आदेश काढले. आता रुग्णसंख्या कमी होत असून प्राणवायूची मागणीही कमी होत आहे.

जिल्ह्यातील अनेक उद्योगांना ऑक्सिजन गॅस लागतो. त्यात प्रामुख्याने फाँड्री, फॅब्रिकेशन, साखर कारखान्यांना लागणारे साहित्य बनविणारे उद्योग, इंजिनिअरिंग यासह बऱ्याच उद्योगाचा समावेश आहे. मात्र, गेल्या दीड महिन्यांपासून जिल्हा प्रशासनाने औद्योगिक वसाहतीमधील ऑक्सिजन गॅस पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे अनेक उद्योग पुन्हा अडचणीत सापडले आहेत. ऑक्सिजनची मागणी पूर्वीच्या तुलनेत आरोग्यासाठी कमी झाली आहे. त्यामुळे उद्योगक्षेत्राचा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्याची मागणी मालू यांनी केली आहे.

चौकट

कामगारांसह कुटुंबांची उपासमार

जिल्ह्यात ऑक्सिजन गॅसवर चालणाऱ्या उद्योगांची संख्या जास्त आहे. कामगारांची संख्या हजारोंनी आहे. दीड महिन्यांपासून हे उद्योग बंद आहेत. त्यामुळे कामगारांसह त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारी होत आहे. उद्योगांना ऑक्सिजन पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करावा, अशी मागणी चेंबरचे उपाध्यक्ष जयपाल चिंचवाडे आणि सचिव गुंडू एरंडोले यांनी केली आहे.

Web Title: Loss of industry due to shutdown of oxygen gas supply