शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार? प्रकाश आंबेडकर उमेदवार देणार; समीकरणे बदलणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 12:23 IST

lok sabha election : आज वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला आहे. लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढणार असल्याची घोषणा केली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत येणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. आज वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला आहे. लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढणार असल्याची घोषणा केली आहे. आंबेडकर यांनी वंचितची पहिली यादीही जाहीर केली आहे. सांगली लोकसभेसाठी प्रकाश शेंडगे यांनी निवडणूक लढविल्यास त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, यामुळे आता सांगली लोकसभा मतदारसंघातील समीकरणे बदलणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. 

मोठी बातमी: प्रकाश आंबेडकरांचा मविआला धक्का; पहिली उमेदवार यादी जाहीर

वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. याबाबत बैठकाही झाल्या होत्या. दरम्यान, वंचितने ६ जागांसाठी महाविकास आघाडीकडे प्रस्ताव दिला होता, तर महाविकास आघाडीने ५ जागांचा प्रस्ताव दिल्याचे बोलले जात होते. काल खासदार संजय राऊत यांनी अजूनही वंचितसोबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले होते. तर आज वंचितने महाविकास आघाडीला धक्का देत आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. 

२०१९ च्या निवडणुकीत तीन लाखांहून अधिक मते मिळवली

मागील २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभा मतदार संघात भाजपाकडून संजयकाका पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विशाल पाटील, वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर हे उमेदवार होते. या निवडणुकीत खासदार संजयकाका पाटील यांनी ५०८९९५ एवढी मते घेऊन विजय मिळवला होता. तर विशाल पाटील यांना ३४४६४३ एवढी मते मिळाली होती, तर वंचितच्या गोपीचंद पडळकर यांना तीन लाखांहून अधिक मते मिळाली होती. आता या लोकसबा निवडणुकीतही सांगली लोकसभेसाठी वंचितकडून प्रकाश आंबेडकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे आता सांगली लोकसभेची समीकरणे बदलणार असल्याची चर्चा सुरू आहे.   सांगली लोकसभेवर ठाकरे गटासह काँग्रेसकडूनही दावा

महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. सांगली लोकसभा जागेवर काँग्रेससह ठाकरे गटानेही दावा केला आहे. कोल्हापूर लोकसभेची जागा ठाकरे गटाने सोडल्याने ठाकरे गटाने सांगली लोकसभेवर दावा सांगितला आहे. या मतदारसंघातून ठाकरे गटाने पैलवान चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणाही केली आहे.  

वंचित आघाडीने पहिली यादी केली जाहीर

अकोला- प्रकाश आंबेडकरचंद्रपूर - राजेश बेलेभंडारा गोंदिया - संजय केवटगडचिरोली - हितेश मढावीबुलढाणा - वसंत मगर नागपुरातून काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांना पाठिंबा

टॅग्स :Sangliसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी