शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
3
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
4
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
5
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
6
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
7
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
8
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
9
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
10
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
11
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
12
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
13
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
14
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
15
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
16
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
17
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

Lok Sabha Election 2019 विशाल यांचा ३५ लाख खर्च, तर संजयकाकांचा ५९ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 11:25 PM

शरद जाधव। लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या सूक्ष्म खर्चावरही निवडणूक विभागाची करडी नजर असून, प्रत्येक उमेदवाराला ...

शरद जाधव।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या सूक्ष्म खर्चावरही निवडणूक विभागाची करडी नजर असून, प्रत्येक उमेदवाराला आपला खर्च देताना दमछाक होत आहे. अभिरूप निरीक्षण नोंदवहीनुसार भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांचा सर्वाधिक खर्च ५९ लाख ५८ हजार ७६३ रुपये झाला आहे, तर आघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांचा खर्च ३५ लाख ७० हजार ४११ रूपये झाला आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकरही मागे नसून, त्यांनी आतापर्यंत २८ लाख २३ हजार ७७३ रूपये खर्च केला आहे.निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रचारादरम्यान तीनवेळा उमेदवारांना आपला खर्च सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यात उमेदवाराने सादर केलेला खर्च व अभिरूप निरीक्षण नोंदवहीतील तपशिलाचा ताळेबंद करून त्यातील तफावत व इतर अहवाल तात्काळ आयोगास सादर करण्यात येत आहे.उमेदवारांच्या खर्चाची पहिली तपासणी सोमवारी पूर्ण झाली असून त्यानंतर भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील व आघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांच्या खर्चातील तफावतीमुळे त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला आहे.उमेदवारांनी सादर केलेला खर्च हा नोंदवहीतील नोंदींच्या तुलनेत कमी आहे. उमेदवारांचा वाहनांवरील खर्च व इतर खर्च निवडणूक विभागाने नोंदविल्यामुळे नोंदवही आणि प्रत्यक्ष उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चाच्या नोंदीत तफावत आढळून येत आहे. मात्र अंतिम खर्च सादर करताना छोट्या-मोठ्या खर्चासोबतच सूक्ष्म खर्चाचा विचार करून त्यांचा मेळ घालण्यात येणार आहे.लोकसभा निवडणुकीसाठी ७० लाखांची खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये उमेदवारांना १० हजार रुपयांपर्यंतचा खर्च रोखीने करण्यास संमती देण्यात आली आहे. यापेक्षा अधिकचा होणारा आर्थिक व्यवहार हा उमेदवारांना रोखीने करता येणार नाही. आता गुरूवारी उर्वरित खर्च उमेदवारांना सादर करण्याबाबत सांगण्यात आले आहे. २३ एप्रिल रोजी मतदान झाल्यानंतर उमेदवारांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष खर्चाचे प्रतिज्ञापत्रही खर्च निरीक्षकांना सादर करावे लागणार आहे. त्यानंतर निवडणूक खर्च निरीक्षक त्यांच्या खर्चाची तपासणी करणार आहेत.तीनवेळा खर्च द्यावा लागणारनिवडणूक कालावधित उमेदवारांना तीनवेळा आपल्या खर्चाचा तपशील सादर करावा लागणार आहे. यामुळे आता गुरूवारी व त्यानंतर २१ एप्रिललाही सर्व उमेदवारांना आपला खर्च प्रशासनासमोर द्यावा लागणार आहे. यात तफावत आढळल्यास उमेदवारांना कारणे दाखवा नोटिसा बजाविण्यात येतील.वाहनांवरील खर्च जादाउमेदवारांचा प्रामुख्याने वाहनांवरील खर्च तूर्तास जादा असल्याचे प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. सांगली लोकसभा मतदारसंघाचा भौगोलिक आवाका मोठा आहे. यासाठी त्या-त्या भागात प्रचार यंत्रणा राबविताना उमेदवारांना वाहनांची सोय करावी लागत आहे. उमेदवारांकडून सर्वप्रथम वाहनांची परवानगी घेण्यात येते. त्याचाही तपशील एकत्रित करण्याचे काम प्रशासनातर्फे सुरू होते. यात प्रमुख पक्षांसह अपक्षांनीही प्रचारासाठी वापरलेल्या साधनांची मोजदाद होऊन त्याची नोंद केली जात आहे.निवडणुकीसाठी खर्च मर्यादा ७० लाखांची असणारउमेदवारांना निवडणूक कालावधित ७० लाखांपर्यंतच्या खर्चाला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, मतदारसंघाचे मोठे क्षेत्र, वाहनांची सोय, कार्यकर्त्यांचा लवाजमा लक्षात घेता, ठरवून दिलेल्या मर्यादेत निवडणुकीचा खर्च करताना उमेदवारांची दमछाक होत आहे. नियमानुसार खर्चालाच प्राधान्य दिले जात आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक