शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

Lok Sabha Election 2019 भाजपकडून ‘वंचित’ आघाडीची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 11:42 PM

जत : धनगर समाजाला भाजपने फसवले आहे. हा फसलेला समाज आपल्याला लोकसभा निवडणुकीत मतदान करणार नाही, म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र ...

जत : धनगर समाजाला भाजपने फसवले आहे. हा फसलेला समाज आपल्याला लोकसभा निवडणुकीत मतदान करणार नाही, म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतांचे विभाजन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी निर्माण केली आहे. धनगर समाजातील तरुणांनी या फसवणुकीचा बदला घेण्यासाठी निवडून येणाऱ्या उमेदवाराला मतदान करणे आवश्यक आहे, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.महाआघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ जत शहरातील गांधी चौकात आयोजित सभेत ते बोलत होते.आ. पाटील म्हणाले की, शेतीमालाला हमीभाव, कर्जमुक्ती, बेरोजगारी, धनगर आरक्षण, यासंदर्भात २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिले होते. परंतु मागील पाच वर्षात या आश्वासनांची पूर्तता त्यांनी केली नाही. यासंदर्भात ते काहीच बोलण्यास तयार नाहीत. याशिवाय परत सत्तेवर आल्यानंतर काय करणार आहेत, तेही सांगण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी तयार नाहीत. प्रचार सभांमधून विरोधकांची निंदानालस्ती व स्थानिक नेत्यांवर टीकाटिपणी करण्यातच ते धन्यता मानून घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा कमी होत आहे, हे लक्षात आल्यानंतरच भाजपचे लोक देशातील नागरिकांच्या भावना भडकवित आहेत.आ. पाटील म्हणाले कू, विरोधी उमेदवार खासदार संजय पाटील व गोपीचंद पडळकर एकमेकांवर टीका करण्यात मग्न आहेत. एकमेकांची निंदानालस्ती करत आहेत. परंतु आम्ही गोरगरिबांच्या विकासासाठी प्रयत्न करत आहोत. देशाचा विकास व कर्तव्यापलीकडे जाऊन राजकारण केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी महाआघाडीच्या विशाल पाटील यांना मतदान करून विजयी करा.यावेळी माजी आमदार उमाजी सनमडीकर, रविकांत तुपकर, काँग्रेसचे नेते विक्रम सावंत, सुरेश शिंदे यांचीही भाषणे झाली.उत्तम चव्हाण, अ‍ॅड. चन्नाप्पा होर्तीकर, इकबाल गवंडी, कुंडलिक दुधाळ, स्वप्नील शिंदे, भूपेंद्र कांबळे, शिवाजी शिंदे, नीलेश बामणे, आप्पासाहेब बिराजदार, रमेश पाटील, महादेव पाटील, मल्लेशी कत्ती, श्रीकांत शिंदे, महादेव कोळी, रमेश पाटील, सुजय शिंदे, संतोष कोळी, तुकाराम माळी उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक