इस्लामपूरमध्ये अस लॉकडाऊन असेल तर काय होईल... पहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 16:19 IST2020-04-24T16:19:07+5:302020-04-24T16:19:36+5:30
इस्लामपूर शहर कोरोनामुक्त झाले आणि लॉकडाऊनची मुदत संपण्यापूर्वीच शहरातील लोक रस्त्यावर आले आहेत. त्यामुळे उपविभागीय अधिकारी नागेश पाटील यांनी १० जूनपर्यंत लॉकडाऊनची मुदत वाढवली आहे. हा आदेश कागदावरच आहे. याची काटेकोरपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही.

इस्लामपूरमध्ये अस लॉकडाऊन असेल तर काय होईल... पहा
अशोक पाटील ।
इस्लामपूर : इस्लामपुरात कोरोना शिरल्याचे २३ मार्चला समजले आणि प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. पहिल्या आठवड्यात शासकीय अधिकाºयांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. दुसºया, तिस-या आठवड्यात शहर कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर होते. चौथ्या आठवड्यात सर्व पॉझिटिव्ह रुग्ण निगेटिव्ह झाले. याचे श्रेय घेण्यासाठी राजकीय नेते आणि प्रशासनातील काहीजण सोशल मीडियावर सक्रिय असून, नागरिक मात्र रस्त्यावर बिनधास्त फिरत आहेत.
इस्लामपूर शहर कोरोनामुक्त झाले आणि लॉकडाऊनची मुदत संपण्यापूर्वीच शहरातील लोक रस्त्यावर आले आहेत. त्यामुळे उपविभागीय अधिकारी नागेश पाटील यांनी १० जूनपर्यंत लॉकडाऊनची मुदत वाढवली आहे. हा आदेश कागदावरच आहे. याची काटेकोरपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही. इस्लामपुरात सहा दिवस पूर्णत: लॉकडाऊन असताना, गोरगरीब, रोजंदारी करणा-यांनी बाहेर पडू नये यासाठी पोलीस उपविभागीय अधिकारी कृष्णत पिंगळे यांनी ‘माणुसकीचं नातं’ या ग्रुपमार्फत दोनवेळचे डबे देण्याचा उपक्रम सुरू केला. जेवण वितिरित करताना सोशल डिस्टन्स्ािंगचे तंतोतंत पालन केले जात आहे.
त्यानंतर राष्ट्रवादीने पालकमंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे शहराध्यक्ष शहाजी पाटील यांच्या देखरेखीखाली कम्युनिटी किचनच्या माध्यमातून ‘माणुसकीची थाळी’ सुरू केली. या थाळीत एकवेळचे पोटभर जेवण मिळते. रोज २००० गोरगरीबांना जेवण दिले जाते. परंतु वितरणावेळी जेवणापेक्षा नेत्यांचे फोटोसेशनच जास्त दिसत आहे. याला शह देण्यासाठी काही नेत्यांनी आपापल्या प्रभागात धान्य, तेलाचे कीट वाटप केले आहे. त्याच्या प्रसिद्धीसाठी सोशल मीडियाचा वापर सुरू आहे.