शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

स्वरांच्या दीपोत्सवात उजळली संगीत सभा, रसिक मंत्रमुग्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 14:52 IST

रसिकांवर अवीट गोडीच्या स्वरचांदण्यांचा वर्षाव करीत मंगळवारी त्रिपुरारी पोर्णिमेला सांगलीत संगीत संध्या उजळली. शास्त्रीय, उपशास्त्रीय गायनाच्या विविध छटा, हृदयाला साद घालणाऱ्या वाद्यांचा बहर, गुरु-शिष्यांची साथसंगत अशा वातावरणात संगीताचार्य द. वि. काणेबुवा प्रतिष्ठानची संगीत सभा पार पडली.

ठळक मुद्दे स्वरांच्या दीपोत्सवात उजळली संगीत सभा, रसिक मंत्रमुग्ध काणेबुवा प्रतिष्ठानच्या संगीत सभेला दाद

सांगली : रसिकांवर अवीट गोडीच्या स्वरचांदण्यांचा वर्षाव करीत मंगळवारी त्रिपुरारी पोर्णिमेला सांगलीतसंगीत संध्या उजळली. शास्त्रीय, उपशास्त्रीय गायनाच्या विविध छटा, हृदयाला साद घालणाऱ्या वाद्यांचा बहर, गुरु-शिष्यांची साथसंगत अशा वातावरणात संगीताचार्य द. वि. काणेबुवा प्रतिष्ठानची संगीत सभा पार पडली.सांगलीच्या नेमिनाथनगर येथे ही सभा पार पडली. मनोहरलाल सारडा यांच्या सहकार्याने व गुरुकुल संगीत विद्यालयातर्फे कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

संगीत सभेची सुरुवात प. पू. बजरंग झेंडे महाराज, मनोहर सारडा, राधाकिसन डोडिया, वास्तुविशारद प्रकाश जाधव, हरीभाऊ काबरा, ओमप्रकाश झंवर, रतनलाल सारडा यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

यावेळी विदुषी मंजुषा पाटील-कुलकर्णी, पीएनजीह्णचे समीर गाडगीळ, प्रवीणशेठ लुंकड,शांतिनात कांते, प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद बेडेकर, उमेश देसाई उपस्थित होते.मैफलीची सुरुवात गुरुकुलची विद्यार्थीनी शर्वरी केळकरच्या राम बिहागने केली. गायकीतील कलात्मकता, रसिकांच्या हृदयाला भिडणारी गोडी याद्वारे शर्वरीने बिहागला सजविले. त्यानंतर याच रागातील लट उलझी सुलझा जा रे बालम ही बंदीशी पेश केली. त्यानंतर तिने गायलेल्या अवघाची संसार सुखाचा करीन या भजनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.पद्मश्री पंडित उल्हास कशाळीकर यांचे शिष्य पुण्याचे सौरभ नाईक यांनी मैफलीला वेगळ््या उंचीवर नेले. त्यांनी राग मुलतानी आळविताना गोकुल गाव का छोरा, बरसाने की नार हा बडा ख्याल ताणांच्या सुंदर सजावटीने सजवित रसिकांच्या हृदयात घर केले. त्यानंतर संगीत सौभद्र मधील राधाधर मधू मिलिंद जय जय रे हे नाट्यगीत गाऊन मैफलीत आपल्या स्वरांचे रंग उधळले. त्यानंतर बाजे रे मुरलिया बाजे, पायो जी मैने राम रतन धन पायो ही भजने सादर करून भक्तीच्या दरवळाने सर्वांना मोहीत केले.मंजुषा कुलकर्णी यांनी अवघा गर्जे पंढरपूर, अबीर गुलाल उधळीत रंग, श्रीरंगा कमलाकांता ही अभंग श्रृखंला सादर करून भक्तीमय वातावरणात रंग भरला. त्यानंतर त्यांनी माई सॉंवर रे रंग राची ही भैरवी सादर करताना ताणांची नजाकत पेश केली. त्यानंतर संत कान्होपात्रा या नाटकातील जोहार मायबाप जोहार हे नाट्यगीत सादर करून मैफलीची सुंदर सांगता केली. मैफलीत संवादिनी साथ कृष्णा मुखेडकर यांनी, बासरीसाथ सचिन जगताप, प्रथमेश तारळेकर, तबलासाथ सौरभ सनदी यांनी तर टाळसाथ गुरुनाथ कुलकर्णी यांनी दिली.निवेदनातून मैफलीचा सेतूगीतेतील उपदेश, धार्मिक, सांस्कृतिक तत्वांचे विवेचन आणि संगीतातील सुंदरतेचे बारकावे रसिकांसमोर मांडत निवेदक व प्रवचनकार श्रेयस बडवे यांनी मैफलीचा सुंदर सेतू उभारला. 

टॅग्स :musicसंगीतSangliसांगली