शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्यास जन्मठेप, इस्लामपूर न्यायालयाचा जलदगती निकाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 11:59 IST

इस्लामपूर : शिराळा तालुक्याच्या एका गावातील सहा वर्ष वयाच्या  अल्पवयीन चिमुरडीवर लैगिक अत्त्याचार करणाºया जयवंत  उर्फ बाबज्या रामा शिरसट ...

इस्लामपूर : शिराळा तालुक्याच्या एका गावातील सहा वर्ष वयाच्या  अल्पवयीन चिमुरडीवर लैगिक अत्त्याचार करणाºया जयवंत  उर्फ बाबज्या रामा शिरसट (वय ४६,रा. शिरसटवाडी)याला दोषी धरून येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे दुसरे जिल्हा न्यायाधीश अनिरूध्द थत्ते यांनी जन्मठेप व ४० हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने अवघ्या ११ महिन्यात या खटल्याचा निकाल देत नराधम आरोपीला  कारागृहाची वाट दाखविली.दंडाच्या रकमेतील ३५ हजार रुपये पीडित मुलीस देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.गेल्या वर्षी जून महिन्यात आरोपी जयवंत शिरसट याने अल्पवयीन मुलीस जबरदस्तीने एका झुडपाजवळ घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्त्याचार केला होता. यावेळी मुलीच्या नात्यातील महिलेने प्रसंगावधान राखत आरोपीवर ओरडल्याने त्याने तेथून पलायन केले. मुलीने ही घटना घरी सांगितल्यावर  आरोपी  जयवंत शिरसट याच्याविरूध्द कोकरूड पोलिसात फिर्याद देण्यात आली.त्यावरून शिरसटवर बलात्कार, बाललैंगिक अत्त्याचार प्रतिबंधक कायदा आणि अनुसूचित जाती जमाती अत्त्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिस उपअधिक्षक मंगेश चव्हाण यांनी  या गुन्ह्याचा तपास करीत जयंत शिरसट याच्याविरूध्द दोषारोपपत्र दाखल केले होते.या खटल्याची सुनावणी न्या.थत्ते यांच्यासमोर झाली. अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रणजीत पाटील याने या खटल्यात  पाच साक्षीदार तपासले. त्यातील फिर्यादी, पंच, साक्षीदार,वैद्यकीय अधिकारी, जन्म-मृत्यू निबंधक व तपास अधिकाऱ्यांची साक्ष ग्राह्य मानत न्यायालयाने आरोपी जयवंत शिरसाट याला जन्मठेप आणि दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात पैरवी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत कांबळे, हवालदार उत्तम शिंदे, बजरंग खराडे यांनी सरकार पक्षाला मदत केली.

महिलेची दक्षता ...घटनेदिवशी पिडीत मुलगी ही इतर मुलांसोबत खेळत होती. सायंकाळी ७ नंतर ही मुले घरी परतत होती. यावेळी आरोपी शिरसट याने पिडीत मुलीस बाजूच्या झुडपाजवळ घेऊन जात तिच्यावर अत्त्याचार करत होता. याचवेळी एका महिलेचे लक्ष गेल्याने  तिने ओरडताच आरोपीने पलायन केले. या महिलेच्या दक्षतेमुळे  मोठा अनर्थ टळून त्याला जन्माची शिक्षा भोगायची वेळ आली.

आरोपीची खैर नाही ...गेल्या वर्षीच्या १७ जूनच्या सायंकाळी ही घटना घडली. दुसºया दिवशी आरोपीविरूध्द गुन्हा नोंद झाला. पोलिसांनी गतीने तपास करीत आरोपपत्र दाखल केले. न्यायालयात  या खटल्याची १२ डिसेंबर २०२४ ला पहिली सुनावणी झाली. २९ मार्चच्या दुसºया सुनावणीत ६ साक्षीदाराचे जबाब घेण्यात आले. आरोपीचे निवेदन आणि सरकारी वकीलांचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने या खटल्याचा जलदगतीने निकाल देताना  आरोपीची खैर केली जाणार नाही असाच संदेश दिला.

पिडीत मुलीवर मानसिक आघात...या खटल्यातील पिडीत मुलीचा जबाब न्यायाधीशांच्या कक्षामध्ये घेण्यात आला. यावेळी आरोपीची ओळख पटविण्याकरिता  मुलीला आरोपीचा चेहरा व्ही.सी.व्दारे दाखविण्यात आला. त्याचा चेहरा पाहताच पिडीत मुलगी दचकून बाजूला जावून रडू लागली.या घटनेतून पिडीत मुलीच्या मनामध्ये आरोपीची दहशत किती खोलवर होती, याची देखील न्यायिक नोंद जिल्हा न्यायाधीश थत्ते यांनी घेतली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय