शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: एलआयसी अधिकाऱ्याला मिरजेत सव्वा कोटींचा गंडा, दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 12:11 IST

ऑनलाइन पद्धतीने फसवणूक 

मिरज : मिरजेतील एलआयसीच्या विकास अधिकाऱ्यास भामट्या दाम्पत्याने व्हॉटस्ॲप कॉल करून संपर्क साधला. ब्लॅकमेल करत एक कोटी ३७ लाख रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी आयुर्विमा अधिकाऱ्याने मिरज शहर पोलिसांत फसवणुकीची फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दि. २४ मार्च २०२२ ते १२ डिसेंबर २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला. फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांत त्यांनी फिर्याद दिली.मिरजेत एलआयसीमध्ये विकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याशी दीपक वाधवा व त्याची पत्नी कोमल ऊर्फ कोमलदेवी वाधवा असे नाव सांगून भामट्या दाम्पत्याने वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकांवरून संपर्क साधला. सुरुवातीला व्हॉटस्ॲप कॉल करून संपर्क साधत ते रविता सोनी असल्याचे सांगत त्यांनी अधिकाऱ्याच्या परिचिताशी ओळख असल्याचे भासवून पैशाची मागणी केली. त्यांना पैसे दिल्यानंतर त्यांनी पुन्हा ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. वाधवा दाम्पत्याने या अधिकाऱ्याकडून गेल्या दोन वर्षांत एक कोटी ३७ लाख ११ हजार ३७९ रुपये बँक खात्यातून ऑनलाइन पद्धतीने घेतले. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अधिकाऱ्याने पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार दीपक वाधवा व कोमल वाधवा ऊर्फ कोमलदेवी दोमराज (पूर्ण नाव व पत्ता नाही) या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराने शहरात खळबळ उडाली होती.

टॅग्स :SangliसांगलीfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस