पश्चिम महाराष्ट्रात महिला राष्ट्रवादी आघाडी भक्कम करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:23 IST2021-04-14T04:23:56+5:302021-04-14T04:23:56+5:30

राजारामनगर येथे राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास छाया पाटील यांनी अभिवादन केले. यावेळी विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील, शहाजी पाटील, रणजित ...

Let's strengthen the women's nationalist front in western Maharashtra | पश्चिम महाराष्ट्रात महिला राष्ट्रवादी आघाडी भक्कम करू

पश्चिम महाराष्ट्रात महिला राष्ट्रवादी आघाडी भक्कम करू

राजारामनगर येथे राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास छाया पाटील यांनी अभिवादन केले. यावेळी विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील, शहाजी पाटील, रणजित पाटील, सुस्मिता जाधव, रोझा किणीकर, कमल पाटील, सुनीता देशमाने, प्रा. अनिल पाटील उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्रात महिला राष्ट्रवादी अधिक भक्कम करू, अशी ग्वाही महिला राष्ट्रवादीच्या नूतन पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस छाया पाटील यांनी दिली.

महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा छाया पाटील यांना पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस पदावर बढती मिळाली आहे. त्यांना महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते व जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे निवड पत्र देण्यात आले.

छाया पाटील यांनी राजारामबापू कारखाना कार्यस्थळावरील राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, शहराध्यक्ष शहाजी पाटील यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी महिला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षा सुस्मिता जाधव, शहराध्यक्षा रोझा किणीकर, प्रदेश सदस्या कमल पाटील, कार्याध्यक्षा सुनीता देशमाने, जिल्हा उपाध्यक्षा अरुणा पाटील यांनी छाया पाटील या पश्चिम महाराष्ट्रातील महिला संघटन वाढीस निश्चितपणे ताकद देतील, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी माजी जि. प. उपाध्यक्ष रणजित पाटील, प्रा. अनिल पाटील, श्रीमती शैलजा जाधव, कामेरी अध्यक्षा अलका पाटील, आकाराम पाटील, सदाशिव पाटील, भगवान पाटील, वैभव पाटील, प्रा. संजय पाटील, अतुल पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Let's strengthen the women's nationalist front in western Maharashtra