शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत ‘चला नदीकडे जाऊया’ अभियान सुरू, पहिल्याच दिवशी २ टन कचरा उठाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 19:39 IST

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आयोजन

सांगली : राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त सांगली शहरात सामाजिक बांधीलकी जपत स्वच्छतेसाठी निर्धार फौंडेशनच्या तरुणांनी ‘चला नदीकडे जाऊया’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली. यामध्ये सांगलीकरांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कृष्णा नदीकाठी स्वच्छता मोहिमेत योगदान दिले.गेल्या काही वर्षांत कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. नागरिकांनी या समस्येची जाणीव ठेवून नदीच्या संवर्धनासाठी पुढे यावे, या उद्देशाने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. २१ दिवसांपासून विशेष स्वच्छता मोहीम राबविली जात असून अधिकाधिक नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी संत गाडगेबाबा जयंतीचे औचित्य साधून अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमात सतीश दूधाळ, मुस्तफा मुजावर, शशिकांत ऐनापुरे, हिमांशू लेले, रंजीत चव्हाण, मोहन शिंदे, सचिन ठाणेकर, पवन ठोंबरे, दादा शिंदे, सुरज कोळी, अनिल अंकलखोपे, भाग्यश्री दिवाळकर, शकील मुल्ला आदींनी सहभाग घेतला.

पहिल्याच दिवशी २ टन कचरा उठावपहिल्याच दिवशी ४० स्वच्छतादूतांनी अवघ्या दोन तासांत सरकारी घाट आरशासारखा स्वच्छ केला. दोन टन कचरा उठाव केला. सामाजिक संघटनांचा सकारात्मक प्रतिसाद उपक्रमास मिळत आहे. पुढील काही दिवसांत या उपक्रमात नागरिकांचा आणखी मोठा सहभाग अपेक्षित आहे.

पाचजणांना जीवनगौरव पुरस्कारनिर्धार फौंडेशनच्या वतीने सांगली शहरात स्वच्छता, प्लास्टिक निर्मूलन या कामी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पाचजणांना प्रतिवर्षी ‘संत गाडगेबाबा जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती फाऊंडेशनचे प्रमुख राकेश दड्डणावर यांनी दिली.

नदी ही आपल्या जीवनाचा आधार आहे. तिची स्वच्छता व संवर्धन करणे आपली जबाबदारी आहे. गेल्या २१ दिवसांपासून आम्ही कृष्णामाईसाठी विशेष स्वच्छता मोहीम राबवित आहोत, पण ही चळवळ अधिक व्यापक व्हावी म्हणून संत गाडगेबाबा जयंतीच्या निमित्ताने 'चला नदीकडे जाऊया' अभियान सुरू केले. पहिल्याच दिवशी नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. - राकेश दड्डणावर, संस्थापक, निर्धार फाऊंडेशन.

टॅग्स :Sangliसांगलीriverनदी