आष्ट्यात बिबट्याचे दर्शन; नागरिकांत भीतीचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:18 IST2021-06-30T04:18:25+5:302021-06-30T04:18:25+5:30
आष्टा : आष्टा शहरात मंगळवारी रात्री बिबट्याने दर्शन दिले. आष्टा पोलीस ठाणे ते सोमलिंग तलाव या परिसरात बिबट्याचे दर्शन ...

आष्ट्यात बिबट्याचे दर्शन; नागरिकांत भीतीचे वातावरण
आष्टा : आष्टा शहरात मंगळवारी रात्री बिबट्याने दर्शन दिले. आष्टा पोलीस ठाणे ते सोमलिंग तलाव या परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याची माहिती काही युवकांनी पोलिसांना दिली. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे.
आष्टा पोलीस ठाण्याच्या पाठीमागील बाजूने सोमलिंग तलाव परिसराकडे बिबट्या गेल्याचे निखिल माळी, अक्षय गुळे, बाळू गावडे या युवकांनी पाहिले त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. आष्टा पोलिसांनी तातडीने पोलीस निरीक्षक अजित सिद यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सोमलिंग तलाव, बाजारवाडी, वग्यानी प्लॉट, शिंदे चौक, चौंडेश्वरी मंदिर, गोरडे चौक यासह शहरातील विविध भागात नागरिकांना माहिती दिली. घराबाहेर पडू नये अशा सूचना दिल्या. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना बिबट्याचा वावर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. बिबट्या नक्की कुठे आला आहे याची शहरात जोरदार चर्चा सुरू हाेती.