आष्ट्यात पुन्हा बिबट्याचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:18 IST2021-07-03T04:18:34+5:302021-07-03T04:18:34+5:30
आष्टा : आष्टा शहर व परिसरात शुक्रवारी पुन्हा बिबट्याचे दर्शन झाले. परिसरात मंगळवारी व बुधवारी बिबट्याचे दर्शन झाले हाेते. ...

आष्ट्यात पुन्हा बिबट्याचे दर्शन
आष्टा : आष्टा शहर व परिसरात शुक्रवारी पुन्हा बिबट्याचे दर्शन झाले. परिसरात मंगळवारी व बुधवारी बिबट्याचे दर्शन झाले हाेते. यानंतर शुक्रवारी दुपारी कर्मवीरनगर परिसरात पुन्हा बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मंगळवारी रात्री आष्टा पोलीस ठाणे ते शिंदे चौक या मार्गावर काही तरुणांना बिबट्याचे दर्शन झाले हाेते. आष्टा पोलीस व वन विभागाचे पथक त्याच्या मागावर असताना बुधवारी बिबट्याच्या पायाचे ठसे मिळाले. त्याच दिवशी रात्री त्याने कुत्र्याची शिकार करून उसात धूम ठोकली होती. यानंतर शुक्रवारी कर्मवीर नगर परिसरात पुन्हा बिबट्या दिसला.
आष्टा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद यांच्यासह शिराळाचे वनक्षेत्रपाल एस. आर. काळे, वनरक्षक दीपाली सागावकर, रायना पाटोळे, सुरेश चारापले, मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील, निवास उघडे, भगवान गायकवाड, बाबासाहेब गायकवाड, उस्मान मुल्ला यांनी आष्टा परिसरातील वाड्या-वस्त्यावर बिबट्याबाबत माहिती घेतली.
परिसरातील शेतात ठसे मिळतात का? याची पाहणी केली. आष्टा ते बावची या परिसरात बिबट्या असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना आष्टा पोलीस ठाण्यामागील विश्रामगृह ते महात्मा गांधी विद्यालय परिसरातील ऊसपट्टा व कर्मवीर नगर परिसरात बिबट्या दिसला. या परिसरात कॅमेरे लावण्यात आले आहेत. अशी माहिती वनक्षेत्रपाल एस. आर. काळे यांनी दिली.