शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

महागाई, बेरोजगारीविरोधात डाव्या पक्षांनी पुकारले देशव्यापी आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 17:58 IST

भाजपच्या जनताविरोधी, कॉर्पोरेटधार्जिण्या आणि धर्मांधतेला उत्तेजन देणाऱ्या धोरणाचा निषेध केला जाईल.

सांगली : महागाई आणि बेरोजगारीविरुद्ध डाव्या पक्षांनी २५ ते ३१ मे दरम्यान देशव्यापी आंदोलन जाहीर केले आहे. राज्यात आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन डाव्या पक्षांनी दिले आहे.काल, सोमवारी (दि.२३) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, लाल निशाण पक्ष आणि भारताचा कम्युनिस्ट पक्ष यांच्या राज्यस्तरीय ऑनलाइन बैठकीत हा निर्णय झाला. २५ ते ३१ मे दरम्यान राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि तहसीलदार कार्यालयांवर उग्र मोर्चे आणि निदर्शने केली जातील.भाजपच्या जनताविरोधी, कॉर्पोरेटधार्जिण्या आणि धर्मांधतेला उत्तेजन देणाऱ्या धोरणाचा निषेध केला जाईल. आंदोलनात संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा, जन आंदोलनांची संघर्ष समिती हेदेखील सहभागी होत आहेत.बैठकीला 'माकप'चे डॉ. अशोक ढवळे, डॉ. उदय नारकर, डॉ. एस. के. रेगे, 'भाकप'चे तुकाराम भस्मे, प्रकाश रेड्डी, प्रा. राम बाहेती, सुभाष लांडे, 'शेकाप' चे राजू कोरडे, 'लानिप'चे भीमराव बनसोड, राजेंद्र बावके, भाकप 'लिबरेशन'चे शाम गोहील व अजित पाटील उपस्थित होते.संयोजकांनी सांगितले की, बेरोजगारीने कळस गाठला असताना गरिबांना दैन्याच्या खाईत ढकलले जात आहे. गेल्या वर्षभरात पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती ७० टक्के, भाजीपाल्याच्या २० टक्के, स्वयंपाकाच्या तेलाच्या २३ टक्के, डाळींच्या आठ टक्के वाढल्या आहेत. गहू १४ टक्क्यांनी महागला आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांकडून गव्हाची खरेदी कमी करत निम्म्याहून खाली आणली आहे. केंद्र सरकारचे यावर्षीचे ४.४४ कोटी टन गहू खरेदीचे उद्दिष्ट आहे, पण ते २ कोटी टनही होणार नाही.डाव्या पक्षांच्या मागण्या अशासंघटनांनी मागणी केली की, केंद्राने सर्व पेट्रोलियम पदार्थांवरील सेस आणि कर कमी करावेत. गॅस सिलिंडरची दरवाढ मागे घेतली पाहिजे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून गहू पूर्ववत मिळावा. दरवाढीला आळा घालण्यासाठी रेशनिंग व्यवस्था मजबूत करावी. त्याद्वारे सर्व जीवनावश्यक वस्तू, विशेषतः डाळी आणि खाद्यतेलाचा पुरवठा करावा. आयकर लागू नसलेल्या कुटुंबांना दरमहा  ७ हजार ५०० रुपये द्या, रोजगार हमी योजनेच्या तरतुदीत वाढ करा, बेरोजगार भत्त्यासाठी केंद्रीय कायदा करा, शहरी भागासाठी रोजगार हमी योजनेचा कायदा करा, शासकीय कार्यालयांतील सर्व रिक्त जागा त्वरित भरा.

टॅग्स :SangliसांगलीInflationमहागाईBJPभाजपा