शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

सांगलीत उमेदवारांसह सर्वच पक्षांच्या नेत्यांनीही बजावला मतदानाचा हक्क

By अशोक डोंबाळे | Published: May 07, 2024 2:19 PM

कुंडलमध्ये विश्वजीत कदम, विशाल पाटील यांची भेट

सांगली : महाविकास आघाडी, महायुती यांच्यासह अपक्ष उमेदवारांनी आपल्या स्थानिक मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्राच्या भेटी दरम्यान, कुंडल (ता. पलूस) येथे काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम व अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांची भेट झाली. प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला.अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी सपत्नीक पद्माळे (ता. मिरज) येथे तर महायुतीचे उमेदवार खासदार संजय पाटील यांनी चिंचणी (ता. तासगाव) येथे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांनी भाळवणी (ता. खानापूर) येथे मतदानाचा हक्क बजावला. उर्वरित अपक्ष उमेदवारांनीही आपल्या मतदान केंद्रावर जाऊन कुटुंबीयांसह मतदान केले. पालकमंत्री सुरेश खाडे यांनी पत्नी सुमनताई यांच्यासह अंबाबाई तालीम संस्थेची महिला विकास केंद्र येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम यांनी पत्नी स्वप्नाली, आई विजयमाला कदम, डॉ. जितेश कदम यांनी सोनसळ (ता. कडेगाव) येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, पृथ्वीराज देशमुख, सदाशिवराव पाटील, विलासराव जगताप, आमदार विक्रमसिंह सावंत, आमदार सुमनताई पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, माजी उपाध्यक्ष सुहास बाबर आदी दिग्गज नेत्यांनीही मतदानाचा हक्क बजावला. माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी कोंगनोळी ता. कवठेमहांकाळ येथे मतदान केले.हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी साखराळे (ता. वाळवा) येथील मतदान केंद्रावर मतदान केले. त्यांच्यासमवेत राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील, उद्योजक राजवर्धन पाटील होते.हुतात्मा साखर कारखाना अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी वाळवा येथे मतदान केले. चिखली (ता. शिराळा) येथील मतदान केंद्रावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व आमदार मानसिंगराव नाईक यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी सुनीतादेवी नाईक, मुली शर्मिला, मोनालीसा व पल्लवी होत्या.तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांचीही मतदान केंद्रावर गर्दीअनेक भागात उष्णतेची लाट असतानाही मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा करून मतदानाचा हक्क बजावला. तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांचीही मतदान केंद्रावर गर्दी दिसून येत होती. नवमतदारांमध्ये मोठा उत्साह दिसत आहे.

टॅग्स :Sangliसांगलीsangli-pcसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४vishal patilविशाल पाटीलsanjaykaka patilसंजयकाका पाटीलchandrahar patilचंद्रहार पाटीलVishwajeet Kadamविश्वजीत कदमVotingमतदान