शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

सांगली लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे ठरलंय, नेते हतबल

By हणमंत पाटील | Updated: May 2, 2024 18:30 IST

तुमच्यावेळी हक्काने सांगा, पण आता काय बोलू नका

हणमंत पाटील सांगली : तुमच्या विधानसभेला हक्काने सांगा, आम्ही जातीने तुमच्यासोबत आज पण आणि उद्या पण. तेवढे या लोकसभा निवडणुकीच्या वेळी याच उमेदवाराचा प्रचार करा, आघाडी व युतीधर्म पाळा, असे सांगून आम्हाला धर्मसंकटात टाकू नका. ‘आमचं ठरलंय,’ असे कार्यकर्ते ठामपणे नेत्यांना सांगत आहेत. त्यामुळे नेते, आजी-माजी आमदार कार्यकर्त्यांपुढे हतबल झाले आहेत.सांगली लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. एका बाजूला उन्हाच्या झळा वाढत असतानाही सांगली लोकसभेतील प्रमुख पक्षाचे उमेदवार पायाला भिंगरी लावून फिरताना दिसत आहेत. मात्र, जिल्ह्याच्या विधानसभा मतदारसंघातील आजी-माजी आमदारांना मात्र काय करावे, हे सूचत नसल्याची परिस्थिती ग्राउंडवर आहे. आपल्याला पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचे पालन करावे लागेल, अन्यथा विधानसभेचे तिकीट कट होण्याची भीती आहे.मात्र, कार्यकर्ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत. साहेब, यावेळी काही बोलू नका, विधानसभेला प्रामाणिकपणे व निष्ठेने काम करतो, असे आश्वस्त करीत आहेत. कार्यकर्त्यांवर जास्त दबाव टाकला, तर ते दुखावले जातील, ही भीती आहे. अशीच परिस्थिती भाजप, कॉंग्रेस व राष्ट्रवादी या तीन प्रमुख पक्षांत कमी-अधिक प्रमाणात सारखीच आहे.

लोकसभेला एकत्र, विधानसभेला विरोध..राज्यातील शिवसेना व राष्ट्रवादी पक्षात फूट पडली. त्यामुळे एक गट महायुतीसोबत, तर दुसरा गट महाविकास आघाडीसोबत आहे. पक्ष फुटीनंतरची ही पहिलीच सार्वजनिक निवडणूक आहे. त्यामुळे खानापूर-आटपाडी व जत या विधानसभा मतदारसंघातील आमदार व विरोधक हे लोकसभेला एकत्र फिरताना दिसत आहेत. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीत हे चित्र उलटे पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

राजकीय समीकरणे बदलणार..सध्या सांगली लोकसभेतील सहापैकी तीन विधानसभांचे आमदार सुमन पाटील (तासगाव-कवठेमहांकाळ), डॉ. विश्वजीत कदम (कडेगाव-पलूस) व विक्रम सावंत (जत) हे महाविकास आघाडीच्या उमेदवारांसोबत फिरताना दिसत आहेत. तसेच, पालकमंत्री सुरेश खाडे (मिरज), सुधीर गाडगीळ (सांगली) व स्वर्गीय अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर (खानापूर-आटपाडी) हे तिघे महायुतीच्या उमेदवारासोबत फिरताना दिसत आहेत. मात्र, प्रत्यक्षात सहा विधानसभा आमदारांचे कार्यकर्ते मात्र विरोधी गटाला साथ देतानाचे चित्र ग्राउंडवर आहे. त्यामुळे लोकसभेला कोणता उमेदवार विजयी होणार, यावर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.

अन्यथा तिकिट कापण्याची भीती..सांगली लोकसभा निवडणुकीतील सहा विधानसभा मतदारसंघांतील नेते एका उमेदवारामागे आणि कार्यकर्ते दुसरीकडे असे वेगळे चित्र पहायला मिळत आहे. हायकमांड व पक्षश्रेष्ठी यांचे आदेश उमेदवाराला मताधिक्य देण्याचे आहेत. प्रत्यक्षात मात्र कार्यकर्त्यांपुढे काही चालत नसल्याची हतबलता नेते उघडपणे व्यक्त करीत आहेत. मात्र, आपल्या विधानसभा मतदारसंघात आपण मताधिक्य न दिल्यास आपले तिकीट कापण्याची भीतीही नेत्यांना वाटत आहे.

जिल्ह्यातील विधानसभेचे बलाबलआमदार  - पक्ष - विधानसभासुधीर गाडगीळ - भाजप - सांगलीसुरेश खाडे - भाजप - मिरजविक्रम सावंत - काँग्रेस - जतडॉ. विश्वजित कदम - काँग्रेस - कडेगाव-पलूससुमन पाटील - राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) - तासगाव-कवठेमहांकाळस्व. अनिल बाबर - शिवसेना (एकनाथ शिंदे) - खानापूर-आटपाडी

टॅग्स :Sangliसांगलीsangli-pcसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४vishal patilविशाल पाटीलsanjaykaka patilसंजयकाका पाटीलchandrahar patilचंद्रहार पाटील