शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
2
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
3
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
4
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
5
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
6
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
7
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
8
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
9
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
10
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
11
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
12
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
13
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
14
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
16
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
17
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
18
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
19
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
20
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट

हरित राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादन आता गतीने होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 13:31 IST

पुणे आणि बंगळुरू शहरांना जोडण्यासाठी सातारा आणि सांगली जिल्ह्यांच्या दुष्काळी टापूतून जाणाऱ्या ६९९ किलोमीटर लांबीच्या नवीन हरित राष्ट्रीय महामार्गाची घोषणा गडकरी यांनी मार्चमध्ये केली होती.

तासगाव : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे-बंगळुरू हरित महामार्ग (ग्रीन फिल्ड हायवे)बाबत केलेल्या घोषणेनंतरच लगेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्रक्रियेस सुरुवात केली आहे. त्यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी भूसंपादनाबाबतचे आदेश दिले असून, त्यासाठी खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ व मिरज तालुक्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.पुणे आणि बंगळुरू शहरांना जोडण्यासाठी सातारा आणि सांगली जिल्ह्यांच्या दुष्काळी टापूतून जाणाऱ्या ६९९ किलोमीटर लांबीच्या नवीन हरित राष्ट्रीय महामार्गाची घोषणा गडकरी यांनी मार्चमध्ये केली होती. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या बंगळुरू आणि हैदराबाद कार्यालयाकडून महामार्गाच्या सर्वेक्षणाचे काम झाले. त्यानंतर, प्रस्तावित मार्गासाठी मोजणीचे काम पूर्ण करण्यात आले. आता प्रत्यक्ष भूमी संपादनाची प्रक्रिया सुरू होत आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी खानापूर तालुक्यासाठी विटा येथील उपविभागीय अधिकारी तर तासगाव, कवठेमहांकाळ व मिरजेसाठी मिरजेचे उपविभागीय अधिकारी यांना नियुक्त केले आहे.

या गावांत होणार भूसंपादनतालुका - गावे :खानापूर - माहुली, वलखड, वेजेगाव, भेंडवडे, साळशिंगे, जोंधळखिंडी, माधळमुठी, वासुंबे, रेणावी, रेवणगाव, घोटी खुर्द, घोटी बुद्रुक, तासगाव - कचरेवाडी, नरसेवाडी, किंदरवाडी, विजयनगर, पेड, मोराळे, मांजर्डे, गौरगाव, हातनोली, बस्तवडे, सावळज, वज्रचौंडे, मणेराजुरी, गव्हाण, कवठेमहांकाळ - बोरगाव, मळणगाव, हारोली, देशिंग, बनेवाडी, शिंदेवाडी खुर्द, कुकटोळी, रामपूरवाडी, कोंगनोळी, मिरज - सलगरे, बेळंकी, संतोषवाडी.

कोणत्या तालुक्यात किती अंतर

  • खानापूर १२६.५७० ते १५०.१०० किमी
  • तासगाव १५०.१०० ते १७६.७४० किमी
  • कवठेमहांकाळ १७६.७४० ते १९६.०३५ किमी
  • मिरज १९६.०३५ ते २०१.२०० किमी

३१ हजार कोटी खर्च अपेक्षितया महामार्गासाठी ३१ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. महामार्ग तयार झाल्यानंतर बंगळुरू आणि पुणे या शहरातील अंतर ७५ किलोमीटरने कमी होणार आहे. तो सहापदरी असेल.

टॅग्स :Sangliसांगलीhighwayमहामार्ग