कार्वे येथे २० हजारांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:20 IST2020-12-27T04:20:26+5:302020-12-27T04:20:26+5:30

विटा : राहत्या बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख चार हजार रुपयांसह अर्धा तोळे सोन्याचे दागिने लंपास ...

Lampas looted Rs 20,000 at Karve | कार्वे येथे २० हजारांचा ऐवज लंपास

कार्वे येथे २० हजारांचा ऐवज लंपास

विटा : राहत्या बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख चार हजार रुपयांसह अर्धा तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री कार्वे (ता. खानापूर) येथे घडली. यावेळी चोरट्यांनी गावातील अन्य चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न केल्याचे शनिवारी निदर्शनास आले.

कार्वे येथील सुवर्णा नारायण जाधव या घराच्या मुख्य दरवाजाला कुलूप लावून बाहेरगावी गेल्या होत्या. त्यामुळे अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी व कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी व रोख चार हजार असा सुमारे २० हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास करून पोबारा केला. या प्रकरणी सुवर्णा जाधव यांनी शनिवारी दुपारी विटा पोलिसांत फिर्याद दिली.

त्यावेळी चोरट्यांनी एकाच रात्री अन्य चार ठिकाणी बंद घरांची कुलपे तोडून चोरीचा प्रयत्न केल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले.

Web Title: Lampas looted Rs 20,000 at Karve