लाडेगावची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:20 IST2021-05-28T04:20:06+5:302021-05-28T04:20:06+5:30
वशी : विलगीकरण कक्ष आणि अथक प्रयत्नाने लाडेगाव (ता. वाळवा) कोरोनामुक्तीच्या दिशेने जात आहे. गावात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पहिला ...

लाडेगावची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने
वशी : विलगीकरण कक्ष आणि अथक प्रयत्नाने लाडेगाव (ता. वाळवा) कोरोनामुक्तीच्या दिशेने जात आहे.
गावात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पहिला रुग्ण सापडला आणि बघता बघता रुग्णसंख्या ८२ वर पोहोचली. मात्र, सरपंच रणधीर ऊर्फ राजू पाटील यांनी प्रथम लोकवर्गणीतून गावातील प्राथमिक मराठी शाळेमध्ये विलगीकरण कक्ष उभारला. सेंटरमध्ये सर्व रुग्णांची सोय करून रुग्णांच्या मनोरंजनासाठी रेडिओ व दोन वेळेचा चहा, नाष्टा, अंडी, दोन वेळेच्या जेवणाची व वाचण्यासाठी वेगवेगळ्या दैनिकांची खास सोय करण्यात आली. आतापर्यंत गावातील दहा रुग्णांचा मृत्यू झाला असून, ६६ जण कोरोनावर मात करून बरे झाले आहेत. सध्या केवळ ६ रुग्ण या कक्षात आहेत.
उपसरपंच अरविंद देसाई, सोसायटीचे अध्यक्ष विजय पाटील, पाणीपुरवठा संस्थेचे सत्त्वशील पाटील, रामराव पाटील, कुंडलिक पाटील, पोलीस पाटील नौशाद मुल्ला, ग्रामसेवक डी. पी. सिंग, तलाठी प्रियांका हिरवे, आरोग्य समुदाय अधिकारी विश्वनाथ पाटील, आशा वर्कर्स दीपाली दाईंगडे, सुषमा कांबळे, रुक्मिणी वाघमारे यांनी प्रयत्न केले.
फोटो ओळी : २७०५२०२१-आयएसएलएम-लाडेगाव : लाडेगाव येथे कोरोना रुग्णांसाठी जिल्हा परिषद शाळेत विलगीकरण कक्ष उभा केला आहे.