जिल्ह्यातील वाङ्मयीन उपक्रमात गांभीर्याचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:18 IST2021-06-28T04:18:49+5:302021-06-28T04:18:49+5:30

आरग (ता. मिरज) येथे कवी प्रदीप पाटील यांचा सत्कार जी. के. ऐनापुरे यांच्याहस्ते झाला. यावेळी शशिकला गावडे, सरिता कोरबू, ...

Lack of seriousness in literary activities in the district | जिल्ह्यातील वाङ्मयीन उपक्रमात गांभीर्याचा अभाव

जिल्ह्यातील वाङ्मयीन उपक्रमात गांभीर्याचा अभाव

आरग (ता. मिरज) येथे कवी प्रदीप पाटील यांचा सत्कार जी. के. ऐनापुरे यांच्याहस्ते झाला. यावेळी शशिकला गावडे, सरिता कोरबू, अधिका बाबर, हरिभाऊ गावडे, चंद्रकांत बाबर आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

लिंगनूर : कवी प्रदीप पाटील यांची साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल आरग येथे झलकारी संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला. त्यांच्या निवडीमुळे गंभीर प्रवृत्तीच्या कवी, लेखकांना बळ मिळेल असा विश्वास साहित्यिक जी. के. ऐनापुरे यांनी यावेळी व्यक्त केला. जिल्ह्यात अनेक वाङ्मयीन उपक्रम होत असले तरी त्यात गांभीर्याचा अभाव असल्याचे ते म्हणाले.

ऐनापुरे यांच्याहस्ते पाटील यांना राजर्षी शाहूंची प्रतिमा व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ऐनापुरे यांनी सांस्कृतिक मूल्यांच्या ऱ्हासावर वर बोट ठेवले. ते म्हणाले, शाहू महाराजांनी जातीअंतासाठी केलेले कार्य अलौकिक आहे. ते सर्वसामान्यांपर्यंत न्यायला हवे. जिल्ह्यात अनेक वाङ्मयीन उपक्रम होत असले तरी त्यात गांभीर्याचा अभाव आहे. तशीच परिस्थिती लेखनाचीही आहे. चांगल्या निर्मितीसाठी आणि चळवळी सशक्त होण्याकरिता पुरोगामी विचारांची बैठक महत्त्वाची आहे.

प्रा. प्रदीप पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. झलकारी संस्थेच्या अध्यक्षा शशिकला गावडे यांनी प्रास्ताविक केले. भूपाल कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. अधिका बाबर यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सरिता कोरबू, डॉ. अनिल कोरबू, मुख्याध्यापक हरिभाऊ गावडे, सागर आवळे, सीमा पाटील, संतोष पवार, चंद्रकांत बाबर, चेतन शेट्टी, सुप्रिया चव्हाण, हणमंत व्हनाळे, राजश्री चव्हाण, प्रमोद पाटील, प्रताप पवार, अश्विनी इंगळे आदी उपस्थित होते.

Web Title: Lack of seriousness in literary activities in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.