कुपवाड एमआयडीसीत जुगार अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:24 IST2020-12-23T04:24:33+5:302020-12-23T04:24:33+5:30

कुपवाड : कुपवाड एमआयडीसीतील मुख्य रस्त्यालगत असलेल्या पेट्रोलपंपामागे मोकळ्या जागेत सुरू असलेल्या तीनपानी जुगार अड्ड्यावर कुपवाड पोलिसांनी छापा टाकून ...

Kupwad MIDC raids on gambling dens | कुपवाड एमआयडीसीत जुगार अड्ड्यावर छापा

कुपवाड एमआयडीसीत जुगार अड्ड्यावर छापा

कुपवाड : कुपवाड एमआयडीसीतील मुख्य रस्त्यालगत असलेल्या पेट्रोलपंपामागे मोकळ्या जागेत सुरू असलेल्या तीनपानी जुगार अड्ड्यावर कुपवाड पोलिसांनी छापा टाकून तिघांना अटक केली. या छाप्यात पोलिसांनी जुगारातील ५१ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये संदीप दत्ता शेंडगे (वय ३२, रा. वाघमोडेनगर, कुपवाड), विक्रम केदारी जाधव (५३, रा. कवठेपिरान, ता. मिरज), तात्या फुलचंद वाघमोडे (२४, रा. कुपवाड) यांचा समावेश आहे. विष्णू माळी (रा. कवलापूर) व तानाजी कोळेकर (रा. कुपवाड) पोलिसांना पाहून तेथून पसार झाले आहेत.

कुपवाड एमआयडीसीतील पेट्रोलपंपामागे मोकळ्या जागेत जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस पथकासह छापा टाकला असता, या जुगार अड्डयावर तीनपानी पत्त्याचा डाव सुरू असल्याचे दिसून आले. यावेळी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेऊन अटक केली, तर दोघे फरार झाले आहेत. पोलिसांनी रोख रकमेसह ५१ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सहायक पोलीस फौजदार वाय. एम. पाटील तपास करीत आहेत.

Web Title: Kupwad MIDC raids on gambling dens