लोकमत न्यूज नेटवर्क
नेलेॅ :
सोनहीरा साखर कारखान्याप्रमाणे कृष्णेच्या सभासदाला दर मिळावा हीच आमची इच्छा आहे. त्याकरिता कारखान्यावर रयत पॅनेलची सत्ता आली पाहिजे, असे प्रतिपादन युवा नेते जितेश कदम यांनी केले.
कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीसाठी पार्श्वभूमीवर उमेदवार प्रशांत पाटील यांच्या प्रचारार्थ नेर्ले (ता. वाळवा) येथील सभासदांच्या बैठकीत जितेश कदम बोलत होते. यावेळी पी. वाय. पाटील, धवल पाटील, सूरज पाटील, बंटी पाटील, अशोक माने आदीसह सभासद उपस्थित होते.
जितेश कदम म्हणाले, यशवंतराव मोहिते यांचा कृष्णा कारखाना उभारणीमध्ये मोठा सिंहाचा वाटा आहे. सभासदांचे न्याय हक्क व खुले सभासद देण्याची कल्पना भाऊंनी मांडली होती. रयत पॅनेल निवडून आल्यानंतर सोनहिरा कारखानाप्रमाणे दर देण्यास कुठेही आम्ही कमी पडणार नाही. सभासदाने कोणत्याही दबावाला न घाबरता निवडणुकीला सामोरे जावे.