वाटेगावात कोविड योद्ध्यांचा पळसे कुटुंबाकडून गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:18 IST2021-06-30T04:18:03+5:302021-06-30T04:18:03+5:30
वाटेगाव : वाटेगाव (ता. वाळवा) येथील विजय पळसे व चंद्रकांत पळसे बंधूंनी आईच्या प्रथम स्मृतिदिनी इतर खर्च टाळून ...

वाटेगावात कोविड योद्ध्यांचा पळसे कुटुंबाकडून गौरव
वाटेगाव : वाटेगाव (ता. वाळवा) येथील विजय पळसे व चंद्रकांत पळसे बंधूंनी आईच्या प्रथम स्मृतिदिनी इतर खर्च टाळून काेराेनाविराेधी लढ्यामध्ये याेगदान देणाऱ्या १० आशासेविका व १२ अंगणवाडीसेविकांना साडी, चोळी व दोन हजार रुपये मानधन देऊन सन्मान केला. वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र भिसे, मनीषा पळसे व स्मिता पळसे यांच्या हस्ते या सेविकांचा गौरव करण्यात आला.
वाटेगाव येथील पळसे कुटुंबाने धार्मिक कार्यक्रमाला फाटा देत सामाजिक जाणिवेतून आई सुभद्रा सदाशिव पळसे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त कासेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, आशासेविका आणि अंगणवाडीसेविकांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला. कोविडकाळातील योगदानाबद्दल साडी-चोळी व प्रत्येक दोन हजार रुपये मानधन देऊन गौरव करून सामाजिक बांधीलकी जपली. यावेळी डॉ. राजेंद्र भिसे, डॉ. नीलेश पन्हाळे, डॉ. रासकर, डॉ. भूषण चौगुले यांचा सत्कार तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रदीप चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जयवंत जंगले, दत्तात्रय पंडित, रमेश कपाळे उपस्थित होते.
फोटो : २९ वाटेगाव १
ओळ : वाटेगाव (ता. वाळवा) येथे कोविड योद्ध्यांचा गौरव मनीषा पळसे यांच्या हस्ते करण्यात आला.