‘स्वाभिमानी’च्या वतीने समडोळीत कोविड प्राथमिक सेंटर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:28 IST2021-05-06T04:28:59+5:302021-05-06T04:28:59+5:30
५० बेडचे हे कोविड सेंटर असून यामध्ये १५ आयसोलेशन व ऑक्सिजन बेडचीही निर्मिती करण्यात ...

‘स्वाभिमानी’च्या वतीने समडोळीत कोविड प्राथमिक सेंटर सुरू
५० बेडचे हे कोविड सेंटर असून यामध्ये १५ आयसोलेशन व ऑक्सिजन बेडचीही निर्मिती करण्यात आली आहे.
गतवर्षी हा सामाजिक उपक्रम येथे राबविण्यात आला होता. केवळ पाच हजार रुपयांत ऑक्सिजन बेड तसेच औषधोपचाराची सोय करण्यात आली आहे. हे कोविड सेंटर लोकवर्गणीतून सुरू करण्यात आले आहे. गरीब कुटुंबांतील रुग्णास मोफत उपचार केले जातात. डॉ. राहुल रुग्गे यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार केले जातात.
स्वाभिमानी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय बेले व न्यू रणझुंझार मंडळाचे सर्व सदस्य यासाठी झटत आहेत.
फोटो ओळी : समडोळी येथे कोविड सेंटरचे उद्घाटन करताना खासदार राजू शेट्टी, महावीर चव्हाण, संजय बेले.